DNA मराठी

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती

img 20260330 wa0006

Siddharth Jadhav : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाविषयी

हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील माणसाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा आहे. त्याच्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा प्रभाव असून तो हा चित्रपट हजार वेळा पाहतो. सामाजिक, प्रेरणादायी आणि चित्रपटप्रेमीच्या भावविश्वावर आधारित अशी या चित्रपटाची मांडणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *