Harshvardhan Sapkal : माझ्या वक्तव्यावर मी ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज देवेंद्र फडणवीस प्रकरणात दिले. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांना कोणताही अपशब्द वापरला नाही. मी औरंगजेबचा कारभार आणि सरकारचा कारभार असा काल म्हणालो होतो. माझं वक्तव्य सरकारच्या अनुषंगाने आलेले वक्तव्य आहे. फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोक औरंगजेब ठरवू पाहत आहेत. माजी तुलना राज्य कारभाराशी असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून कोणतीही वयक्तिक टिका केली नाही. असं या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राज्य कारभार देखील औरंगजेबप्रममाणे क्रूर असल्याचं म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली होती.