Dnamarathi.com

Arif Shaikh: एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख (उर्फ आरिफ भाईजान) याचे मुंबईतील जेजे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफला 2022 मध्ये NAI ने अटक केली होती. तेव्हापासून तो आर्थर रोड कारागृहात होता. आरिफ आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या काही जवळच्या साथीदारांविरुद्ध टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती.

आरिफ अबुबकर शेख यांना श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 63 वर्षांचे होते.

आरिफ शेखच्या कुटुंबात कोण आहे?

त्याच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शेखला दोन मुली आहेत. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. तब्येत एकदम बरी होती. अधिकारी आम्हाला काहीच सांगत नाहीत आणि आम्ही जेजे हॉस्पिटलमधून माहिती गोळा केली आहे. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. 

NIA ने फेब्रुवारी 2022 मध्ये दाऊद, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांच्यासह इतरांविरुद्ध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लाँडरिंग, बनावट भारतीय नोटा चलनात आणल्याबद्दल आणि इतर आरोपांबद्दल गुन्हा नोंदवला होता. दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता संपादन करण्यात आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत सक्रिय सहकार्याने काम केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

जामीन का फेटाळला?

आरिफ आणि त्याचा भाऊ शब्बीर यांना अटक केल्यानंतर विविध न्यायालयांनी जामीन अर्ज फेटाळला. तो दाऊदच्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेट, डी-कंपनीचा सदस्य असल्याचे कारण देण्यात आले.

शेखचा भाऊ आणि मोहम्मद सलीम कुरेशी, ज्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखले जाते, त्याच्यावर टोळीच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्यासाठी डी-कंपनीच्या नावावर मोठ्या रकमेचा वापर केल्याचा आरोप होता. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या मृत्यूनंतर त्याने सिंडिकेटचा कारभार हाती घेतल्याच्या आरोपावरून कुरेशीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती.

एनआयएने शेखचा गौरव ग्रीन कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, मंगल नगर, मीरा रोड येथील फ्लॅटही जप्त केला होता. एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 च्या कलम 25 (1) अंतर्गत दहशतवादाची रक्कम म्हणून फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *