DNA मराठी

Ganeshotsav 2025 : मोठी बातमी, जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर 8 सप्टेंबरपर्यंत मनाई

laser light

Ganeshotsav 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात लेझर लाईट, प्रेशर हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर 8 सप्टेंबरपर्यंत मनाई करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी प्रभावी असतील.

जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

विशेषतः अशा साधनांच्या वापरामुळे मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्यांवर तसेच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *