DNA मराठी

Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिव बंधन…

img 20250921 wa0010

Uddhav Thackeray : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ( उ बा ठा ) शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह 20/9/2025 रोजी मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला.

सध्या अहिल्यानगर येथील अस्थिर राजकीय वातावरणात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व शहर प्रमुख किरण काळे यांच्या मागे खंबीर पणे उभे राहणे गरजेचे वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतीक बारसे यांनी सांगितले.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक स्वच्छ चेहेरा असलेले प्रतीक बारसे यांनी शिवबंधन हाती बांधल्याने शहरातील राजकारण बदलणार आहे.

दांडगा जनसंपर्क व सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता मिळाल्याने किरण काळे यांची शहरात ताकत वाढणार आहे.

या पक्ष प्रवेशाला स्वतः उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते विनायक राऊत, अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे, अनिस चुडिवाल, सुनिल भोसले, विलास उबाळे, ओंकार वडे, अभिषेक बारसे, धरम परदेशी, प्रविण पवार, अमोल कारंडे, नदीम शेख, अंबादास सोले, सचिन वाघमारे आदी सह शकडो कार्यकर्ते उपास्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *