Maharashtra Government: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आयएएस अधिकाऱ्यांचा फेरबदल जाहीर केला आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी तसेच महत्त्वाच्या विभागांना नवे नेतृत्व देण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध वजनदार पदांवर बदली करण्यात आली आहे.
शासनाने जारी केलेले आदेश तत्काळ लागू झाले असून, आगामी काळात अनेक धोरणात्मक निर्णयांवर या फेरबदलाचा परिणाम दिसून येणार आहे.
कोणत्या अधिकाऱ्यास कोणती नवी जबाबदारी?
राहुल रंजन माहीवाल यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे येथे नियुक्ती झाली आहे.
प्रकाश खापले, जे आयुक्त – मृदा व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते, त्यांची बदली करून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे.
डॉ. मंजिरी मनोळकर , ज्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे या पदावर होत्या, त्यांची बदली करून त्यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
त्रिगुण कुलकर्णी , उपमहानिदेशक – यशदा, पुणे, यांना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अंजली रमेश , मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, हिंगोली, यांची बदली करत त्यांना आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे नेमण्यात आले आहे.
या फेरबदलामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपल्या नवीन पदांची सूत्रे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






