DNA मराठी

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

raj thackeray

Raj Thackeray on Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान  अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई आणि बारामती येथे त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. यानंतर आता रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे.

तर आता रोहित पवार यांच्या  समर्थनात मनसे प्रमुख राज ठाकरे उतरले असून त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. अनेक संशयाची भूत फिरत आहे. अपघात हा धोक्याचे झाला का? हे समजत नाही. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी एफआयआर द्यायला गेले पण ती घेतली नाही इथे संशयाची सुई निर्माण झाली.

मरीन ड्राइव्ह येथे एफआयआर टाईप करताना DCP येऊन  नाही म्हणतात. जर घरच्या संशय आहे तर मग का एफआयआर नाही? असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  सुनेत्रा वहिनी यांचे पती होते. मग त्यांनी पण याबाबत पुढाकार घ्यायला हवे. काय काळ बेर आहे ? याबाबत संशय निर्माण होत आहे. जर काही संशय आहे तर चौकशी व्हायला हवी

ब्लॅक बॉक्स बाबत पण कळले नाही. सरकार संशयाची भूत नाचवत आहे असे दिसून येत. एफआयआर का नोंदवून घेतले नाही. हा मुळात प्रश्न आहे.

रोहित पवार यांचा एफआयआर नोंदवून गेला जात नसेल तर सामान्य माणसाचे काय? त्रुटी काही असतील ते मांडले जात नसेल तर काय उपयोग. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर यात संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असे वाटत आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *