Dnamarathi.com

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली.

अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.  

शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *