Earthquake News : देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीशिवाय नोएडा आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी होती आणि त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात असल्याचे प्राथमिकरित्या सांगण्यात येत आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
पाकिस्तानी मीडियानुसार, लाहोर, इस्लामाबाद आणि खैबर पख्तुनख्वा शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटर ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 एवढी होती. हा भूकंप दुपारी 2:50 वाजता झाला आणि भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 220 किलोमीटर खाली होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानजवळ होता.

पाकिस्तानातही भूकंप झाला
पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) सांगितले की, दुपारी 2:20 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेशात 213 किलोमीटर खोलीवर होता.
‘डॉनन्यूज’ टीव्ही चॅनलनुसार, इस्लामाबाद, लाहोर आणि त्याच्या आसपासच्या भागात आणि खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पंजाबमधील सरगोधा, खुशाब, मंडी बहाउद्दीन, भाकर आणि नौशेरा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.