DNA मराठी

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू

Trump Steel Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली, त्यांनी परदेशातून येणाऱ्या स्टीलवरील आयात शुल्क सध्याच्या 25 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याची घोषणा केली. नवीन शुल्क दर 4 जूनपासून लागू होणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील यूएस स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स-इर्विन प्लांटमध्ये ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे अमेरिकन स्टील उत्पादकांचे संरक्षण होईल आणि देशाच्या उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही ते 25 टक्क्यांनी वाढवत आहोत.

आम्ही स्टीलवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत, ज्यामुळे अमेरिकेच्या स्टील उद्योगाला अधिक संरक्षण मिळेल.”

चीनवर थेट हल्ला

ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आणि म्हटले की अमेरिकेचे भविष्य “पिट्सबर्गच्या ताकदीने आणि अभिमानाने” बांधले पाहिजे, “शांघायच्या कनिष्ठ स्टीलवर” अवलंबून न राहता. हे विधान चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार तणावाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंबित करते.

उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता

पोलादावरील आयात शुल्क दुप्पट केल्याने गृहनिर्माण, ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रांसारख्या स्टीलवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2018 पासून लागू केलेल्या स्टील टॅरिफनंतर आतापर्यंत स्टील उत्पादनांच्या किमती सुमारे 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

ट्रम्प यांचे व्यापार संरक्षण धोरण सुरूच

राष्ट्रपती ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या सातत्यपूर्ण व्यापार संरक्षण धोरणाचा एक भाग आहे. जानेवारीमध्ये पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ लादला होता, जो मार्चपासून लागू झाला. त्यांनी कॅनेडियन स्टीलवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकीही दिली होती, परंतु नंतर ती मागे घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *