Dhananjay Munde on Manoj Jarang : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा.. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का? यावर उत्तर द्या असं धनंजय मुंडे म्हणाले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा. आमची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरणाची चौकशी सरकारनं नाही तर, सीबीआयने करावी अशी देखील मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.






