Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अचानक भेट दिली त्यांचा हा खाजगी दौरा असल्याचे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. अजित पवारांचे आगमन होताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
साताऱ्यात सर्किट हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही वेळ चर्चा करून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. दरम्यान मागील वर्षी नूतन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर त्यांना पाहणी दरम्यान पार्किंग मधील काही फरश्या फुटल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंता तात्काळ याबाबत विचारणा करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या.
कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना या ठिकाणी अजित पवार बैठकीसाठी गेल्या असून कारखान्याचा आढावा आणि उसाचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने अजित दादा त्या ठिकाणी गेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रश्न विचारतच त्यांनी खासगी दौरा असल्याचा सांगत बोलण्यास नकार दिला यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी देखील चित्रीकरण करण्यास मनाई केली.