Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.