Bachu Kadu : जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बळीराजा देशाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणत बळीराजावरील हे सर्वात मोठं संकट असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलय. जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संकटाच्या काळात बळीराजासोबत राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं म्हणत सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत पाहू नये, असंही बोऱ्हाडे यांनी म्हटलय. दरम्यान, जालन्यात 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व धनगर आंदोलक, धनगर उपोषणकर्ते यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही बोऱ्हाडे यांनी दिलीय.
तसेच राज्यात ज्या दिवशी धनगर समाजाचा मेळावा होईल, त्यादिवशी आम्ही मुंबई जायची तारीख जाहीर करू, असं देखील बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केलंय.






