Ladki Behen Yojana : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी लाडकी बहिण योजना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याची घोषणा महायुती कडून करण्यात आली होती मात्र आतापर्यंत याबाबत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करत आहे.
नुकतंच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी 36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पात देखील लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सभागृहात महायुती सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजकोषीय संतुलन साधल्यानंतर, महाराष्ट्र सरकार आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करेल आणि माझी लाडकी बहीणयोजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.