DNA मराठी

Vijay Kumbhar : पार्थ पवारांना दिलेली “क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद; मुंढवा जमीन प्रकरणात विजय कुंभार भडकले

vijay kumbhar

Vijay Kumbhar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात त्यांचा नाव आल्याने पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधक करत आहे. तर आता मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे.

घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे.

– जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI

– करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट

– रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया

प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *