Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे.
सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.