Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह
Champions Trophy 2025: बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल वगळण्यात आले आहे. तर तर वरुण चक्रवर्तीला आणि हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम संघबीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल आठ एकदिवसीय संघ सहभागी होतील. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने, आयसीसीने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारताच्या गट-टप्प्यात बांगलादेश (20 फेब्रुवारी), पाकिस्तान (23 फेब्रुवारी) आणि न्यूझीलंड (2 मार्च) विरुद्धचे सामने आहेत. जर भारताने आगेकूच केली तर उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल.