DNA मराठी

राजकीय

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते. आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला Read More »

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण? माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी…

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अजित पवार यांना पक्षात घेणार का? यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे.  माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय सामूहिक असेल. मात्र, अजित पवार यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांना पक्षात सामावून घेणार का, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. वैयक्तिक पातळीवर निर्णय घेता येत नाही पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी-सपामध्ये अजित पवारांना स्थान आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शरद पवार म्हणाले, वैयक्तिक पातळीवर असे निर्णय घेता येत नाहीत. संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आधी विचारले जाईल. अजित पवार यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जुलै 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही घेतले होते.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चारपैकी तीन जागा गमावल्यानंतर अजित पवारांच्या गटात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दणक्यानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘भाई-भगिनी’च्या हिताचा विचार करणे भाग पडले.  पत्रकारांशी बोलताना पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यात ‘माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ‘लाडका भाऊ’ या योजनेअंतर्गत रोजगार प्रशिक्षण आणि मानधन देण्याची तयारी आहे. आता बंधुभगिनींच्या हिताकडे लक्ष द्या पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अनेकवेळा मिळाली, पण त्यांच्या अर्थसंकल्पात बहीण-भावांसाठीच्या अशा योजना कधीच दिसल्या नाहीत. बंधू-भगिनींच्या हिताकडे लक्ष दिले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे, मात्र ही जादू केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आहे,  मतदारांनी हुशारीने मतदान केल्यास बहीण, भाऊ आणि इतर सर्वांच्या लक्षात राहील.असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी… Read More »

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Maharashtra Vidhan Parishad Election: महायुतीचा मोठा विजय, क्रॉस व्होटिंगने केला विरोधकांचा गेम?

Maharashtra Vidhan Parishad MLC Election Result: काल झालेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का देत महायुतीने आपले सर्व उमेदवारांना विजय केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महविकास आघाडीचे 2 उमेदवार विजय झाले आहे. वृत्तानुसार, एमएलसी निवडणुकीत 6 विरोधी आमदारांनी क्रॉस व्होट केले आहे. त्यामुळे निकाल सत्ताधारी महायुतीच्या बाजूने लागला आहे. विरोधी मतांमुळे त्यांचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाल्याचा दावाही भाजप नेत्यांनी केला. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले होते, त्यापैकी केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही स्पर्धा खूपच रंजक झाली. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून बड्या पक्षांनी आपल्या आमदारांना शहरातील विविध हॉटेल्समध्ये बसवले होते. असे असतानाही क्रॉस व्होटिंग झाले आणि आकड्यांचा खेळ बदलला. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. मात्र 14 जागा रिक्त असल्याने 274 आमदारांनी मतदान केले. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपत आहे. कोणत्या पक्षातून कोण जिंकले? महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भाजपने आपल्या पाच नेत्यांना उमेदवारी दिली होती आणि ते सर्व विजयी झाले. भाजपचे पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत हे विजयी होऊन आता आमदार झाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमाने यांना संधी दिली. दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे रिंगणात होते आणि ते विजयी झाले आहेत.  काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र क्रॉस व्होटिंगमुळे त्यांचा पराभव झाला. आकड्यांचा खेळ कसा बदलला? MLC निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांना 23 प्रथम पसंतीची मते मिळणे आवश्यक होते. भाजपचे सर्वाधिक 5 उमेदवार रिंगणात होते. ते जिंकण्यासाठी भाजपला एकूण 115 मतांची गरज होती. भाजपची संख्यात्मक ताकद लक्षात घेता ती तीन मतांनी कमी पडत होती.   तर शिंदे सेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेला त्यांच्या 39 आमदारांचा आणि 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित होता. तर अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीचे 39 आमदार आहेत. त्यांचे दोन्ही उमेदवार विजयापासून 7 मतांनी कमी होते. मात्र अजितदादांच्या उमेदवारांचा काही अपक्ष, छोटे पक्ष आणि विरोधकांच्या क्रॉस मतांनी पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT) स्वतःचे 15 आमदार होते. याशिवाय त्यांना एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा होता. त्यामुळे त्यांना आणखी 7 मतांची गरज होती. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांना ही मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. तर शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर एमएलसी निवडणूक लढवत होते. ज्येष्ठ पवार यांचे 15 आमदार आहेत. तर जयंत पाटील यांच्या पक्षाच्या एका आमदाराचाही पाठिंबा मिळाला. या स्थितीत त्यांच्याकडे 16 मते होती आणि विजयासाठी आणखी 7 मतांची आवश्यकता होती. जे पूर्ण झाले नाही. काँग्रेसमध्ये फूट? महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मते सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक ठरली. काँग्रेसकडे 37 मते आहेत. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना विजयासाठी 23 प्रथम पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. यानंतर पक्षाकडे 14 मते शिल्लक होती.  एमएलसी निवडणुकीचा अंतिम निकाल काँग्रेसच्या मतांवरच ठरल्याचे मानले जात आहे. शेकापचे नेते आणि उमेदवार जयंत पाटील यांनी यापूर्वीच काँग्रेसचे चार आमदार क्रॉस व्होट करतील असा दावा केला होता.

Maharashtra Vidhan Parishad Election: महायुतीचा मोठा विजय, क्रॉस व्होटिंगने केला विरोधकांचा गेम? Read More »

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते. हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते.  कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत. त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे.  माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा Read More »

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला

Ahmednagar News: लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पंकज जावळे फेटाळला. अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून आहे.  अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.  या प्रकरणांमध्ये जामिनसाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.  दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला Read More »

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.   एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी Read More »