DNA मराठी

राजकीय

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …”

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात आगामी निवडणुकीबाबत एक मोठं विधान केले.   यावर आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट बारामतीतून हल्ला केला आहे. “देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत. “चिन्हाची काळजी करायची गरज नसते. कारण मी १४ निवडणूक लढलो आहे. यात ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवीन येतात. माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावला आहे. “एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतल्यास त्या संघटनेचं अस्तित्व संपल असं होत नाही. कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत, विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवून देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा,” असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …” Read More »

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय?

Pankaja Munde : दिवसेंदिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. नेमकं कारण काय? या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 61 लाख 47 हजार रुपये रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरली नसल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.  कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. “तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील खात्यात जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय? Read More »

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी

Ahmednagar News:  अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शेंडी जवळ अज्ञात व्यक्तीने टायर जाळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र अद्याप टायर पेटवणारा कोण? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.  तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून त्यामुळे टायर पेटवून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता राज्यात अनेक आंदोलने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी Read More »

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Maratha Reservation :  10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. आज या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.  राज्य सरकारने गेल्या महिन्यात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत नव्याने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वृत्तानुसार, मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन द्यावे लागले. मात्र नंतर त्यांनी सलाईन काढून आरक्षण लागू होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.  गावकरी आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वारंवार सांगण्यावरून त्यांनी थोडे पाणी प्यायले. दरम्यान, उपोषणस्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा सातवा दिवस आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे. अशक्तपणामुळे त्याला चक्कर येत आहे. अन्न, पाणी आणि औषधही घेण्यास नकार देणाऱ्या पाटील यांना तातडीने उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मराठा आंदोलक त्यांना सतत पाणी पिण्याचा आग्रह करत आहेत.   PM मोदींचा कार्यक्रम थांबवणार – जरांगे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून काल त्यांना पाणी देण्यात आले. यामुळे ते संतप्त झाले आणि म्हणाले, “ज्यांनी मला झोपेत पाणी दिले तेच आता मराठा आरक्षण लागू करण्याची जबाबदारी घेत आहेत.” सरकार गप्प बसू शकत नाही आणि असे मानू शकत नाही की माझेच लोक या मार्गाने माझा मृत्यू रोखतील. जर सरकारने दोन दिवसांत कारवाई केली नाही तर मी पुन्हा मुंबईत उपोषण सुरू करेन. याआधी जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच इशारा दिला होता की, जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पीएम मोदींची एकही रॅली महाराष्ट्रात होऊ दिली जाणार नाही. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या प्रारुप अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. हायकोर्टात सरकार काय म्हणाले? दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन पात्र मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. मराठा समाजाला ओबीसी गटांतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसण्याची गेल्या वर्षभरात ही चौथी वेळ आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल Read More »

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट

Amit Shah: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत.  मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.  तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा  यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली. यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे. दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.  विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.  अशात खा.सुजय विखेंच्या  पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट Read More »

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra News: दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरुपी कायापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा Read More »

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान

Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे जाणुन घ्या, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या नव्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे नाव राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार झाले.  निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांची संख्या 81 आहे. त्यापैकी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थनार्थ 57 आमदारांची शपथपत्रे सादर केली, तर शरद पवार यांच्याकडे केवळ 28 प्रतिज्ञापत्रे होती. हे पाहता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला आमदारांचा बहुमताचा पाठिंबा आहे आणि तोच खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा करू शकतो, असा निष्कर्ष आयोगाने काढला. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक विभागातील बहुमत चाचणीसाठीचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने त्यामागचे कारण दिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, त्याचे सदस्य आणि त्यांच्या निवडणुकांचा तपशील कोणताही मूलभूत आधार नसलेला आहे. उल्लेखनीय आहे की, अजित पवार यांच्या बाजूने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अशी माहिती आहे.  त्यानंतर पाच वर्षांनंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी (MVA) च्या माध्यमातून राज्य सरकारचा भाग बनली. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील MVA सरकार जून 2022 मध्ये पडले. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडखोरी झाली आणि पक्ष दोन गटात विभागला गेला. यानंतर शिंदे भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या राजकीय गोंधळानंतर वर्षभरानंतर, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरीचा बिगुल वाजवला. त्यानंतर अजित पवार पक्षाच्या आठ आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले.  अजित पवार सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्या गटात आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान Read More »

Sameer Wankhede :  मोठी बातमी! समीर वानखेडेला आणखी एक झटका, ‘त्या’ प्रकरणात आता दिल्लीत होणार तपास

Sameer Wankhede :  बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करुन चर्चेत आलेले माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच ईडीने आयआरएस अधिकारी वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयाने दिलेला हा तात्पुरता दिलासा अजूनही कायम आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, समीर वानखेडेविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास दिल्लीला वर्ग केला आहे. केंद्रीय एजन्सीने असा युक्तिवाद केला की कार्यवाही आता दिल्लीतून चालविली जात असल्याने, वानखेडे यांनी या प्रकरणात कोणत्याही दिलासासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जावे. न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक आणि नितीन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाविरोधात गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आलेल्या वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. हा तपास ईडीच्या दिल्ली युनिटकडे वर्ग करू नये, अशी मागणी करणारा अंतरिम अर्ज वानखेडे यांनी दाखल केला होता. त्याचवेळी, प्रशासकीय कारणामुळे तपास मुंबईहून दिल्लीला वर्ग करण्यात आल्याचा युक्तिवाद केंद्रीय संस्थेने न्यायालयात केला. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिल्लीला पाठवण्यात आली असून आता मुंबईत काहीच नाही. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने आता गुरुवारी (15 फेब्रुवारी) सीबीआय एफआयआर विरुद्ध वानखेडे यांच्या याचिकेसह या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले. मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने वानखेडेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  मात्र, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Sameer Wankhede :  मोठी बातमी! समीर वानखेडेला आणखी एक झटका, ‘त्या’ प्रकरणात आता दिल्लीत होणार तपास Read More »

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. भाजपकडून   या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र शहा यांचा 15 फेब्रुवारीचा प्रस्तावित दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा हे 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. शाह राज्यातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 15 लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेणार होते. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य दिग्गज नेते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा तीन जिल्ह्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते आणि त्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र देणार होते. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी अकोल्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीला सर्वप्रथम संबोधित केले. अकोला बैठकीत अमित शहा अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शहा उत्तर महाराष्ट्रातील पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगावात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. यानंतर सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगर येथे दर्शनासाठी जाणार होते. यादरम्यान शाह एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार होते, असे सांगण्यात येत आहे.

Amit Shah : अमित शहांचा अचानक महाराष्ट्र दौरा रद्द, अनेक चर्चांना उधाण Read More »