DNA मराठी

राजकीय

Maharashtra News: पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल

Maharashtra News: सहकार चळवळीच्या माध्‍यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच  या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्‍या उत्‍कर्षा करीता त्‍यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्‍याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४४ व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या प्रागणात असलेल्‍या पद्मश्री विखे पाटील यांच्‍या  पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन, अभिवादन केले. याप्रसंगी फौंडेशनच्‍या विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्‍यापक उपस्थित होते.  सहकार चळवळीचे बिज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहीरे वर्गाला ख-याअर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांच्‍या असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्‍या परिवर्तनात निर्माण केलेले स्‍थान खुप महत्‍वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्‍यसथा ही ग्रामीण भागातील मुलांच्‍या उत्‍कर्षासाठी महत्‍वपूर्ण ठरली. इंग्रजी माध्‍यमांचे शिक्षण सुरु झाल्‍यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्‍या कानाकाप-यात आपले यश सिध्‍द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्‍वीता असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.  सहकार चळवळीपुढे अनेकांनी आव्‍हानं निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न केले. पण लोकांच्‍या विश्‍वासामुळे ही चळवळ कोणीही मोडू शकले नाही. उलट या सहकार चळवळीचा आलेख उंचावत गेला. आज देशात सहकार मंत्रालय स्‍थापन होणे ही मोठी उपलब्‍धी सहकार चळवळीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या स‍ंकल्‍पनेतून सुरु झालेले सहकार मंत्रालय केंद्रीय मंत्री अमित शाह नेतृत्‍वाखाली गतीने पुढे जात आहे.  सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून होत असलेल्‍या निर्णयांचा लाभ गावातील प्राथमिक सोसायट्यांपासून ते सहकारी बॅंकींग आणि कारखानदारीपर्यंत सर्वच सहकारी संस्‍थान होत  असल्‍याचे त्‍यांनी नमुद केले.

Maharashtra News: पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल Read More »

Ahmednagar News: 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार : डॉ. सुजय विखे

Ahmednagar News: ४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून ४०० पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. २०१४ प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले. घोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते.  महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे. ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे. मागील पाच वर्षात त्यांनी केलेली विकास कामे त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे. विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना आवाहन करत आहेत.  शनिवारी श्रिगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवरसांगवी, बनप्रिंपी, थिडे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते विक्रमसिंह पाचपूते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, अर्जून शेळके, सिद्धेश्वर देशमुख, बक्षुद्दीन शेख, राजेंद्र बेरड, घोगरगावचे सरपंच सुजाता भोसले, सुवर्णाताई भोसले, सचिन जगताप  तसेच गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, २०४७ रोजी विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहेत. या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी ४ जून रोजी देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार असून या स्वप्नाची पायाभरणी केली जाणार आहे. मागील १० वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशवासियांचा विश्वास वाढला आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा आकडा सहज गाठता येणार आहे. जिल्ह्यातही लोक नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणुन पाहू इच्छित आहेत. यामुळे राज्यातही महायुतीचा ४५ हून अधिक जांगावर विजय निश्चित आहे. निवडणुक अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान मोदी यांचे क्रेज वाढत आहेत. तुम्ही दिलेला प्रतिसाद ही माझ्या विजयाची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.  श्रिगोंदा तालुक्यातील नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Ahmednagar News: 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार : डॉ. सुजय विखे Read More »

Sujay Vikhe News: विखेना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद

Sujay Vikhe News : अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हयातील श्रध्देय गडाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. येथे येऊन काम करण्यासाठी मोठी उर्जा मिळते. येथील प्रेरणा घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे त्यांनी सांगितले.   खा. सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. गावोगावी लोकांना भेटून महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत केलेल्या लोककल्याणकारी कामांची माहिती लोकांना देत आहेत.  देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी, ही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासासाठी आणि देशासाठी आवश्यक असून येणाऱ्या काळात देशाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व असून देश त्यांच्या हाती सुरक्षित असल्याने लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन ते नागरिकांना करत आहेत.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉ. सुजय विखे पाटील यांनी भगवान गड परिसरातील गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या सोबत आमदार मोनिका राजळे आणि इतर कार्यकर्ते होते. यावेळी डॉ. विखे यांनी भगवान बाबांच्या समाधीला अभिवादन करत महंत शास्त्री महाराज यांचे आशिर्वाद घेतले. तसेच गड परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला.  तर ग्रामस्थांनी देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द यावेळी दिला. खरवंडी, दैत्य नांदूर, टाकळी,पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी सुजय विखे पाटील यांचे वाजतगाजत भव्य स्वागत केले. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की प्रथा, परंपरे प्रमाणे मी गडावर आलो आहे, शास्त्री महाराजांनी मला आशीर्वाद दिला आहे, भगवानगडाच्या परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कटीबद्ध राहू असा देखील विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. तसेच भगवानगड हे महाराष्ट्रातील प्रमुख अध्यात्मिक केंद्र असून त्याचा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणार असे त्यांनी सांगितले.  तसेच संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराचे काम पुर्ण केले जाईल. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगारासाठी पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्थानिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा मार्गदशन केले. मोनिकाताईंनी सांगितले की, मागील पाच वर्षात डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे विविध प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळऊन विविध विकास कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना साथ मिळाल्याने येणाऱ्या काळात डॉ. विखे जिल्ह्याच्या विकास अधिक जलद गतीने करतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.   मनसेचे नेते देविदास खेडकर यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले.यावेळी पाथर्डी शेवगावमतदारसंघातीलअनेक गावातील सरपंच,उपसरपंच, आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe News: विखेना मिळाले श्रद्धेय भगवान गडांचे आशीर्वाद Read More »

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे

Ahmednagar News: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही. केवळ दहशतीला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी आपल्या बगल बच्च्यांमार्फत केले. यामुळे मतदार संघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला. त्यात त्यांनी केवळ उमेदवारीसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत असेही शिंदे म्हणाले.  लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली. प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला. कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याचे राहूल शिंदे यांनी सांगितले.    पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे. सरकारचे अनुदान घेऊन कोवीड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम त्यांनी केले. एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वताला प्रसिद्धी मिळविण्यात दंग होते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब  मतदार संघातील जनतेला रुचलेली नाही.   त्या कोवीड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.  आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असे सांगत   असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली सहा महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली. यामुळे मतदार संघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.   तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी कोविड काळात आपल्या रुग्णालयात लोकांची मोफत सेवा केली. त्याचबरोबर जिल्हाभर आरोग्य शिबीरे राबऊन लोकांना सहकार्य केले. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमिडिअरचा तुटवडा असताना त्यांनी जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न करत हा पुरवठा कायम ठेवला. पण याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. कोणता पुरस्कार मिळावा यासाठी आटापिटा केला नाही. या सर्व सेवाभावी कार्याची सहानभूती डॉ. सुजय विखे पाटील यांना निश्चित मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे Read More »

Maharashtra News: MIM मुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढल्या

Maharashtra News: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरवारी नवा बिडू दाखल झाला आहे. एमआयएम तर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्याने अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेऊन असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. अशरफीच्या रुपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.  दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएम ने उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले. पण तोवर वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोवर संपुर्ण मतदार संघ पातांक्रित करत मतदारांच्या गाठी भेटी वाढवत आपले वातावरण तयार केले आहे. यामुळे महाविकास आघाडीने मतदार संघातील अल्पसंख्याक समाजावर आपले लक्ष केंद्रीत करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. पण आता खुद्द एमआयएम ने आपला गडी रिगंणात दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेची लाट पसरली आहे.  एम आय एम ने दिलेले उमेदवार डॉ. परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी  आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण दक्षिण  लोकसभा मतदार संघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

Maharashtra News: MIM मुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढल्या Read More »

Maharashtra Politics: …म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

Maharashtra Politics:  देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी केले. यामुळे देशात मोदींजी आणि जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील हेच योग्य नेतृत्व करू शकतील असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.    प्रियाताई जानवे यांनी यावेळी विरोधी उमेदवाराचा चांगला समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, आमदार असताना विरोधी उमेदवाराने महिलांना कशा प्रकारे त्रास दिला हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मोठ्या पदावर असतानाही त्या महिलांचे खच्चीकरण करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला. यांची आपल्या सर्वांना माहिती आहे. जर अशी व्यक्ती सत्तेत आली तर महिलांना रस्त्यावरून फिरणे अशक्य होणार आहे.यामुळे अशा विचारसरणीचा माणुस राजकारणात नाही तर समाजात असणे गरजेचे नाही यामुळे अशा वृत्तींना मतदारांनी हाणून पाडले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.  तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना पीठ गिरणी, शेती अवजारे, पॅकिंग मशीन आदी वस्तूंच्या माध्यामातून स्वयंरोजगार देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रधानमंत्री मातृयोजनेच्या मार्फत दीड लाखाहून अधिक महिलांचे मातृत्व सुरक्षित आणि सुखद केले. तर उज्वला योजनेच्या माध्यमातून तीन लाखाहुन अधिक महिलांचे आरोग्य सुरक्षित केले. अशा विविध योजनाच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे हे सच्चा भाऊ म्हणून महिलांच्या मागे उभे राहिले आहेत. यामुळे आपल्या पाठीराख्याला विजयी करणे हे नगर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेचे आद्य कर्तव्य राहणार आहे. येत्या १३ मे रोजी डॉ. सुजय विखे मोठ्या मदाधिक्याने मतदान करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले. 

Maharashtra Politics: …म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे Read More »

Maharashtra News : व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार

Maharashtra News: अहमदनगर मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार सभा, कॉर्नर मिटींग आणि गाठी भेटी देण्यावर भर दिला आहे. याच निमित्ताने ते आज नगर शहरातील कांदा मार्केट मध्ये व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत आमदार संग्राम जगताप, उद्योगपती सचिन कोतकर, अविनाश घुले, निखील वारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी खा. विखे यांनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला की, महायुती सरकार हे व्यापाऱ्याच्या जोडीला आहे. व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक मुलभूत सेवा सुविधांवर सरकारच्या वतीने भर दिला जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपुर लाभ व्यापाऱ्यांना मिळण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.  तसेच नारायन डोह येथील नवीन रेल्वे स्थानकात कांदा व्यापाऱ्यांसाठी रल्वे धक्का निर्माण केला जाईल.त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांना भारतभर कांद्याचा व्यापार करता येईल.विळद येथील नवीन एमआयडीसी मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्यावर प्रकिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभारणी केली जाईल. चिचोंडी पाटील येथे जनावरांचा बाजार उभा करून पशु व्यवसायाला चालणा देण्याचे काम केले जाईल. त्याच कांद्याच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणार अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर सरकार दरबारी असलेले हमाल, मापाडी वर्गाचे विविध प्रश्न प्राथमिकतेच्या जोरावर सोडविले जातील असे ही ते म्हणाले.  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच गरिबांच्या सोबतीला आहेत. हमाल आणि मापाडी, माथाडी कामगार यांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. व्यापारी वर्गासाठी मोदी सराकारने मागील १० वर्षात विविध योजना आणुन त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत.यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. आपले एक मत हे मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग बळकट करण्यासाठी आहे. यासाठी महायुतीच्या बीड मधून पंकजा मुंडे आणि नगर मधून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Maharashtra News : व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार Read More »

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील

Lok Sabha Election: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या ५ वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ५ वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या ५ वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे महायुतीच्या काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरूणांना कामासाठी बाहेर जावे लागणार नाही यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. त्यासाठी तीन एमआयडीसीची कामे तयार असून लवकरत त्या सुरू केल्या जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी बीयाण्यापासून बाजारपेढापर्यंत सेवा सुविधा निर्माण करण्यासा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान मोदींच्या हमीच्या जोरावर जिल्हा सुभलाम सुफलाम करणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

Sujay Vikhe News:  महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर पाठिंबा दिल्याचे पत्र दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्याच बरोबर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.  महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्याता दलित पॅंथरने पाठिंबा जाहिर केल्याने त्यांचे निवडणुकीतील बळ वाढले असून त्यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.   पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथरच्या रुपाने राज्यात आंबेडकरी विचारांची चळवळ उभी केली. यामुळे फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून जाणाऱ्या महायुती सरकार नक्की प्रयत्न करेल असा आमचा विश्वास आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दलित पॅंथर सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले. दलित पॅंथरच्या या भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना त्याचा मोठा फायदा होईल अशा विश्वास सुद्धा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Sujay Vikhe News: दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा Read More »

Maharashtra News: मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत आहे

Maharashtra News: अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्‍यामुळे जिल्‍ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्‍य सरकार हे शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या तालुक्‍यांमध्‍ये शेतक-यांशी संवाद साधला. विविध ठिकाणी झालेल्‍या बैठकांमधून त्‍यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्‍या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सर्वसामान्‍य माणसांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. देश आज विविध क्षेत्रात प्रगती करीत असून, देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  राज्‍य सरकारने शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका नेहमीच घेतली. एक रुपयात पीक विमा योजनाचे लाभ तालुक्‍यातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात मिळाला. अडचणीत सापडलेल्‍या दूध उत्‍पादक शेतक-यांना मदत म्‍हणून राज्‍य सरकारने पाच रुपये अनुदानाची योजना सुरु केली. आज जिल्‍ह्यातील बहुसंख्‍य  शेतक-यांच्‍या खात्‍यात अनुदान वर्ग झाले असून, सर्व शेतक-यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळेल.   जिल्‍ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास इच्‍छुक असून, नामवंत कंपन्‍या येणार असल्‍यामुळे तरुणांनाही संधी मिळेल. यापुर्वी धाक दडपशाहीमुळे चांगले उद्योग जिल्‍ह्यातून निघुन गेले. ही परिस्थिती आपल्‍याला बदलायची असेल तर, उद्योजकांच्‍या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल. देशात पुन्‍हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वामध्‍ये सरकार येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्याच्‍या  विकासाला चांगले पाठबळ मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Maharashtra News: मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश महाशक्‍ती बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करीत आहे Read More »