DNA मराठी

राजकीय

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

Maharashtra Election: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवार घोषणा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. नुकतंच भाजपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा एकदा शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघातून आता गोकुळ दौंड अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आमदार मोनिका राजळे यांना निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे. शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात असल्याचा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वाशीत केले आहे. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती. आ. मोनिक राजळे या 2014 आणि 2019 ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे. मतदार संघ समस्यांनी ग्रासलाशेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे देखील दौंड म्हणाले.

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार? Read More »

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..!

Maharashtra Election:– भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून रविवार दि. 20 रोजी महाराष्ट्रातील 2024 साठी विधानसभेच्या 99 जागांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे आमदार मोनिका राजळे यांना पक्षाने तीसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करताच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भारतीय जनता पार्टीचे समर्थक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, माजी सरपंच अशोकराव खिळे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब जिजा वाघुंबरे, नशीरभाई शेख, आफसर शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर होताच बालमटाकळीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…..! Read More »

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

Maharashtra News: काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा खुलासा केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले. ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समाज धगधगताना दिसला.   संभाजी ब्रिगेड संघटना ही ठाकरेंच्या शिवसेनेसह युतीत आहे, परंतु मराठा समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. स्थानिक मराठा समाजासह इतर मराठा संघटनांनी बॅनरबाजीकरून आपला विरोध या आधीचं मोठ्या प्रमाणात दर्शवला आहे, मात्र जर मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर या सर्व मराठा संघटना आणि संपूर्ण मराठा समाज मोरजकर विरोधात आंदोलनात शामिल होतील आणि यावेळी बॅनरबाजीतूनच नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील. असे कुर्ल्यातील वातावरण आहे.  ठाकरेंची शिवसेना ही कुर्ल्यामध्ये अत्यंत प्रभावशाली दिसून येत आहे परंतु कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनेने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर विरोधात दिलेली हाक ही ठाकरेंच्या शिवसेनेला बॅक फूटला टाकणारी आहे. मराठा समाजाने प्रविणा मोरजकर विरोधात दिलेला आंदोलनाचा इशारा हा आगामी कुर्ल्यातील निवडणुकीचे वारे बदलू शकतो.

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा Read More »

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. त्यामुळे संदीप कोतकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा नगरच्या राजकारणात होत आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात मोठा जल्लोष करण्यात आला. माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे. कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संदीप कोतकर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावे लागेल.

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण Read More »

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील

Ahmednagar Election:  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून  २२५-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी तहसिल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ५९ हजार ७२४ पुरुष, १ लाख ५४ हजार ७४८ महिला व १०७ इतर असे एकूण ३ लाख १४ हजार ५७९ मतदार आहेत.  तसेच मतदार संघामध्ये ५७८ पुरुष, ४२ स्त्री असे एकूण ६२० सैनिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघामध्ये एकूण २९७ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.  ४६ पडदानशील मतदान केंद्रे असून आदर्श मतदान केंद्रांची संख्या ३ एवढी आहे. मतदारसंघात महिला संचलित, युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आणि दिव्यांग संचलित प्रत्येकी एक मतदार केंद्र असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.   निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरूवात होणार असून  २९ ऑक्टोबर २०२४ अंतिम तारीख आहे. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,, गोदाम क्र.६, एम.आय.डी.सी. नागापूर येथे मतमोजणी होणार असल्याची माहितीही  पाटील यांनी यावेळी दिली.    अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा क्र. ०२४१-२३४१९५७  असा आहे. हा कक्ष २४X७  सुरू राहणार असून मतदारांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.  राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar Election: अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »