DNA मराठी

राजकीय

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन

R.T. Jija Deshmukh Dies: भाजपाचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन झाल आहे. ही दुःखद घटना रविवारी संध्याकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील औसा जवळील बेळकुंड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड व लातूर जिल्ह्यांतील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर.टी. जिजा हे औसाकडे प्रवास करत असताना, बेळकुंडजवळ त्यांच्या गाडीच्या काचांवर रस्त्यावरील पाणी अचानक आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे वाहनाने तीन ते चार पलटी घेतल्या. गाडी (क्रमांक एमएच ४४ २७९७) अपघातग्रस्त झाल्यामुळे त्यात बसलेले जिजा देशमुख गंभीररित्या जखमी झाले. अपघातानंतर तातडीने त्यांना लातूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक तळागाळातील समाजाशी नाळ असलेला नेता हरपल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचे अपघाती निधन Read More »

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची

Uday Samant : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. शहीदाच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला. “शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची Read More »

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत…

Rajendra Hagavane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी (ता.23 शुक्रवार )अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या प्रकरणात वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे यांना तत्काळ पोलिसांनी पकडावे आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत होती.त्यामुळे पोलिसांवर याबाबत मोठा दबाव आला होता. दरम्यान, वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तीच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अखेर पोलिसांच्या अटकेत… Read More »

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Rajendra Hagavane : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथा याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती Read More »

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३२५ उद्योग प्रस्तावांना मंजुरी; १ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, ९३ हजार रोजगारांची अपेक्षा राज्य शासनाच्या उद्योग धोरणांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ उद्योग प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमुळे एकूण ₹१,००,६५५.९६ कोटींची गुंतवणूक आणि सुमारे ९३,३१७ नवीन रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. उद्योग विभागाच्या अधीन येणाऱ्या खालील धोरणांचा कालावधी संपला आहे: नवीन धोरणे ठरवण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून, दरम्यानच्या काळात विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रस्तावांना प्रोत्साहन मंजूर करण्यास वित्त विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे. मंजूर करण्यात आलेले प्रमुख प्रस्ताव: 🔹 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ अंतर्गत: 🔹 अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण २०१८ अंतर्गत: 🔹 फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण २०१८ अंतर्गत: राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धोरणांचा कालावधी संपला असतानाही महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प रखडणार नाहीत, तसेच गुंतवणूकदारांना वेळेत प्रोत्साहने मिळून उद्योग सुरू करता येतील, अशी माहिती मंत्रिमंडळानंतर देण्यात आली.

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता Read More »

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले

Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले Read More »

शेतकऱ्यांसाठी CIBIL ची अट ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सी-बिल मागू नका, हे वारंवार सांगितले, तरी बँका सी-बिल मागतात. त्यावर या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकावर शासनाने एफआयआर पण केले आहेत. हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सी-बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घ्यावा, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तंबी दिली. तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167 वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या. यावेळी राज्याचे सन 2025 -26 या वित्तीय वर्षाचा 44 लाख 76 हजार 804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा ही बैठकीत मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी हा राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. या भागाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती नाही, पीक चांगले येणार आहे. अशात बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे. चांगला पाऊस झाला की कृषी विकासदर चांगला असतो. याचा लाभ बँकांनी ही घ्यावा आणि शेतकऱ्यांनाही द्यावा. कृषी क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणूक धोरण राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बँकांची भूमिका महत्वची असून त्यांनी या गुंतवणूकीमध्ये सहभागी व्हावे. कृषी क्षेत्रामध्ये किमान 5 हजार कोटी प्रतिवर्षी गुंतवणुकीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आता गुंतवणुकीला नवीन संधी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीतजास्त पतपुरवठा करावा. त्याचा बँकांना फायदाच होणार आहे. कृषी क्षेत्र आता फक्त सहाय्यक आणि पुनर्वसनात्मक असणार नाही तर एक व्यवसाय म्हणून त्याकडे पाहण्यात येईल. यामध्ये बँकांनी त्यांची भूमिका पार पाडावी. शेतकऱ्यांसाठी आणि या योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना सन्मानित करण्याचे धोरण ठरवावे. जेणेकरून आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि जे चांगले काम करणार नाही, त्यांची नावे घ्या, त्यांच्यावर पुढच्या बैठकीत नाराजीची नोंद व्यक्त करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने अर्धा ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला असून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था होण्यामध्ये बँकांची भूमिका महत्वाची आहे. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. दावोस मधून राज्यात 16 लाख कोटींची थेट गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअप्सची राजधानी आहे. या क्षेत्राकडे ही बँकांनी लक्ष द्यावे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. एसएसएमईमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर असून त्यामध्ये गुंतवणुकीस चांगल्या संधी आहेत. बँकांनी आणि शासनाने मिळून एमएसएमईच्या केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटन, सेवा क्षेत्र यावर बँकांनी प्रथमिकतेने लक्ष केंद्रीत करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, FPO महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये ते महत्वाची भूमिका बजावू शकतात. गडचिरोलीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. त्या ठिकाणी उद्योगांचे जाळे तयार होते आहे. बँकांनी त्यांचे प्राधान्यक्रम सरकारच्या सोबतीने ठरवल्यास समग्र विकास होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अंमलात आणणे ही बँकाची सुद्धा जबाबदारी आहे. त्यातूनच आर्थिक सर्वसमावेशकता साधली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी CIBIL ची अट ठेवू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश Read More »

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का?

Jayant Patil: राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? शेतकऱ्यांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत होता. राज्यभर दिसणारे हे चित्र केविलवाणे आहे असे म्हणाले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? Read More »