DNA मराठी

ताज्या बातम्या

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल

Kunal Patil : धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम भदाणे, आ. अनुप अग्रवाल, आ. मंगेश चव्हाण, आ. राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना भाजपा संघटनेकडून संपूर्ण साथ मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. तर रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. कुणाल पाटील यांनी सांगितले की, गेली सुमारे 75 वर्षे माझे कुटुंब काँग्रेस बरोबर आहे. खानदेश भागाच्या विकासासाठीच अनेक वर्षांचा काँग्रेसबरोबरचा संबंध तोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आपण घेतला. भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून खानदेशचे विकासाचे मनमाड – इंदूर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून विकासाच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही, असा अनुभव आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टीची ताकद धुळे जिल्ह्यात वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू, असेही कुणाल पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल सैंदाणे, बाजीराव हिरामण पाटील, योगेश पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, शकील अहमद, उबाठा उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, विलास चौधरी, ललित माळी, हरिष माळी, डॉ. भरत राजपूत आदींनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार कुणाल पाटील भाजपात दाखल Read More »

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात

Ajit Pawar: पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे मात्र त्यापूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरदचंद्र पवार गटाचे जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर, परभणी, नागपूर, हिंगोली, या जिल्हयातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेतील विविध पक्षातील पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सपाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांनीही मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना सोबत घेऊन महिला, युवक, युवती यांना संधी द्यायची आहे असे सांगतानाच अजित पवार यांनी यापुढे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस पक्षाला देणार असल्याचे जाहीर केले. पक्षात येणाऱ्या लोकांचा नक्कीच मानसन्मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक, आमदार राजेश विटेकर,आमदार राजू नवघरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आमदार डॉ. किरण लहामटे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार विजय भांबळे अजित पवार गटात Read More »

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट

Pratap Sarnaik: एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 1 जुनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो. इ-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पुर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर , public.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

अँडव्हान्स आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा, मिळणार 15% सुट Read More »

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच?

land Scam Sawedi: अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची 35 वर्षांनंतर झालेली संशयास्पद नोंदणी सध्या शहरात चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, या नोंदणीसाठी वापरले गेलेले खरेदीखत 1991 मधील असले तरी, त्या वेळी मूळ मालकाच्या नावाने सातबारा उतारा अस्तित्वात नव्हता, असा धक्कादायक दावा पुढे आला आहे. त्यामुळे भूमाफिया आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साटेलोटाचा नवा प्रकार समोर आल्याची चर्चा रंगली आहे. मूळ मालकाला नोटीस न देता नोंदणी, गंभीर प्रश्नचिन्ह सदर जमीन मूळतः अब्दुल अजीज डायाभाई (पत्ता: झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य: मुंबई) यांच्या मालकीची आहे. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांनी ती खरेदी केली असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, गेली 35 वर्षे ही नोंदणी प्रलंबित असताना अचानकच त्याची नोंद घेतली गेली. विशेष म्हणजे, मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता आणि कोणतीही प्रत्यक्ष माहिती न देता नोंदणी केल्याचा आरोप होत आहे. कागदपत्रांची पडताळणी न करता नोंदणीचा आरोप या नोंदणीसाठी मूळ खरेदीखताच्या मूळ प्रतीची पडताळणी न करता नोंद घेण्यात आली, असा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे मृत अथवा परगावी गेलेल्या मालकांच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांनी प्रशासनाशी संगनमत करून हा प्रकार घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी, आणि काही राजकीय मंडळींच्या वरदहस्तामुळेच हे शक्य झाल्याची चर्चा नागरिकांत आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकाराने नागरिक संतप्त या प्रकरणामुळे सावेडी परिसरातील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भूमाफिया आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जनआंदोलन उभारू,” असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. कायद्याचे उल्लंघन आणि सुधारणा गरजेच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नोंदणी प्रक्रियेतील अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे जाळे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. नोंदणी कायद्यानुसार खरेदीखताची आणि सातबाराच्या नोंदींची सखोल तपासणी बंधनकारक आहे. यामध्ये अपूर्णता किंवा फसवणूक आढळल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून करण्याचा अथवा चौकशीसाठी प्रक्रिया राबविण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे. पण या प्रकरणात हे नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे दिसते. न्यायालयीन चौकशीची मागणी या प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई होऊन न्यायालयीन चौकशी व्हावी आणि भूमाफिया व प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

land Scam Sawedi : सावेडी जमीन नोंदणी प्रकरण : भूमाफिया-प्रशासन साटेलोटाचा नवा नमुना; तेव्हा सातबारा नव्हताच? Read More »

जिल्हा परिषदेत अंशतः बदल की व्यवस्थेचा खेळ?

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेत झालेल्या अंशतः बदल आणि स्थानांतरण प्रकरणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडत आहे. काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे बदल आदेश निघाले खरे, पण त्यामागचे राजकारण आणि व्यवहार आता उघड होऊ लागले आहेत. खरेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या म्हणजे प्रशासनिक गरज, कारभाराचा कार्यक्षम भाग असतो. पण येथे चित्र वेगळे आहे. पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी पाठवण्यात आले जिथे जाणे त्यांना गैरसोयीचे वाटले. त्यानंतर सुरू झाला दुसरा टप्पा — पुन्हा इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची मनधरणी, फिल्डिंग लावणे आणि ‘लक्ष्मी दर्शन’! यामुळे बदल्यांचा हा खेळ एक नवा पायंडा पडतो आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर आणि नीतिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आणि “प्रमो रावसाहेब” सारख्या काही निवडक अधिकाऱ्यांसाठी अपवाद कसे? असा सवाल कर्मचारी वर्गात आणि सामान्य प्रशासनात उपस्थित होतो आहे. सगळ्यांच्या बदल्या झाल्या, मग प्रमो राव साहेबांचे नाव बदल सूचीपासून दूर कसे राहिले? ही बाब केवळ आश्चर्यकारक नाही, तर शंका निर्माण करणारी आहे. आज जिल्हा परिषदेच्या कारभारात असे दिसते की, बदल्यांचा निर्णय गरजेनुसार नव्हे तर देवाण-घेवाणीच्या गणितानुसार होत आहे. अशा प्रकारांमुळे खालच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. प्रश्न इतकाच आहे की, ही व्यवस्था कधी सुधारणार? बदल्यांचे पारदर्शक आणि ठोस धोरण तयार होईल का? की अशाच “व्यवस्था सैल आणि मनमानी पद्धतीने कारभार चालत राहणार का ? जिल्हा परिषद प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व तटस्थ करण्याचे ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

जिल्हा परिषदेत अंशतः बदल की व्यवस्थेचा खेळ? Read More »

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा

Bajrang Sonawane : बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे. ते सिद्ध होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांची संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून काही दिवसांसाठी गायब झाले होते.

बीड मधील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची घटना काळीमा फासणारी…, आरोपींवर कठोर कारवाई करा Read More »

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन आज 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 3 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. बावनकुळे यांनी संघटनेच्या केलेल्या बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते. संघटन पर्वा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाच्या 80 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापाठोपाठ मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम 28 जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार 30 जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल Read More »

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह”

land Scam Sawedi : अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल 35 वर्षांनंतर अचानक होते आणि त्यानंतर उडते धूळधाण. या संशयास्पद नोंदणीमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. खरी धक्का देणारी बाब म्हणजे जमिनीच्या खरेदीखतावर असलेले साक्षीदार कारण ज्यांची नावं या दस्तावर आहेत, तेच पुढे येऊन सांगत आहेत की “आम्ही त्या व्यवहाराचे साक्षीदार नाहीच.” हा प्रकार केवळ खाजगी व्यक्तींमधील जमीन व्यवहाराचा प्रश्न राहिलेला नाही. ही बाब थेट प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर आणि यंत्रणेच्या पारदर्शकतेवर बोट ठेवणारी ठरते. एकीकडे डिजिटल सातबारा, ऑनलाईन फेरफार अशा गोंडस घोषणांचा गजर होत असताना, दुसरीकडे तब्बल तीन दशके झोपलेल्या नोंदी एकाएकी कोणाच्या वरदहस्ताने जाग्या होतात, हेच समजत नाही. या प्रकरणातील साक्षीदारांच्या नकारामुळे संपूर्ण दस्ताऐवजाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये केवळ नोंदणी कार्यालयच नव्हे, तर महसूल यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. कोणत्याही खरेदीखताची वैधता साक्षीदारांवरही ठरते. मग हे साक्षीदार न सांगता, न बोलता नोंदीत कसे सामील झाले? आज सावेडी प्रकरण हा एका मोठ्या व्यवस्थात्मक अपयशाचा आरसा बनला आहे. भूमाफियांना जमीन बळकावण्याचे असे प्रकार म्हणजे सामान्य जनतेच्या हक्कांवर थेट गदा आहे. प्रश्न असा आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग आणि महसूल प्रशासन आता तरी या प्रकरणात कठोर आणि पारदर्शक कारवाई करणार का? शहरातील नागरिक आणि मूळ हक्कधारक आज एकाच प्रश्नाने व्यथित आहेत “भूमाफियांचे हे जाळे कधी फाटेल?” आणि “अशा बनावट साक्षींवर आधारलेल्या नोंदी रद्द होतील का?” आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि पुढील कृतीच यंत्रणेच्या निष्ठेची खरी कसोटी ठरणार आहे. अन्यथा सावेडी प्रकरण आणखी एका फाईलमध्ये धूळ खात पडून राहील आणि भूमाफियांचे बस्तान अधिकच घट्ट होईल.

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह” Read More »

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली

Ahilyanagar News : सावेडी परिसरातील तब्बल 35 वर्षांपूर्वीचा जमीन व्यवहार सध्या संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. सर्वे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंद इतक्या वर्षांनी तलाठी कार्यालयात झाली असून, त्यामुळे भू-माफिया, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्ताचे धागेदोरे समोर येत आहेत. ही जमीन मूळत: अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता – झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य मुंबई) यांच्या नावावर होती. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन खरेदीखताद्वारे विकली गेली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर अचानक नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस दिली न गेल्याने आणि मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंदणी झाल्याने प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे बाहेरगावी गेलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनी हडप करण्याचा डाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यात लाखोंच्या उलाढाली, अधिकाऱ्यांना मिळणारे मोठे आर्थिक फायदे आणि वरून मिळणारे राजकीय संरक्षण यामुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय यंत्रणेतील अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. सावेडी जमीन व्यवहार : 35 वर्षांनंतर नोंदणीचा गोंधळ जमिनीचा तपशील सर्वे नं. : 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) सर्वे नं. : 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) एकूण क्षेत्रफळ: 1 हेक्टर 35 आर मूळ मालक : अब्दुल अजीज डायाभाई (सध्या मुंबईत वास्तव्य) खरेदीदार : पारसमल मश्रीमल शहा खरेदीखत दिनांक : 15 ऑक्टोबर 1991 संशयास्पद बाबी तब्बल 35 वर्षांनंतर नोंदणी मूळ मालकास नोटीस न देता नोंद मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंद तलाठी कार्यालयाच्या कारभारावर संशय

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली Read More »

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल 37 लाख 50 हजार रुपये व दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत या आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई Read More »