DNA मराठी

ताज्या बातम्या

IMG 20241031 WA0004

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

1000027380

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

1000027359

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद

Shrirampur News : श्रीरामपूर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मुद्देमालासह अटक केली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  श्रीरामपूरमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार करून संशयीतवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने  29 ऑक्टोबर रोजी सुतगिरणी फाटा, रेल्वे फाटकजवळ, दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा (वय 32, रा.काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर) असं आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 30,000 रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 1,000 रुपये किंमतीचे 2 काडतुस असा एकुण 31,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 1038/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद Read More »

Ram Shinde And Rohit Pawar

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

1000023650

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे?

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘पुकी’ सोबतचे फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Gues the Pookie’. तिचा पुकी कोण आहे, तिचा नवरा झहीर इक्बाल किंवा तिचा नवीन गोंडस पाळीव मित्र एक मजेदार कॅप्शनसह कोण आहे हे ठरवण्यासाठी अभिनेत्रीने हे तिच्या फॉलोवर्सवर सोडले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले – गर्भधारणेबद्दल अभिनंदन! मात्र, याला जोडप्याने दुजोरा दिलेला नाही.फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तर तिचा पती झहीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघे हसताना दिसत आहेत आणि सोनाक्षीने तिचे पिल्लू धरले आहे. सोनाक्षीच्या सुंदर फोटोंवर तिच्या पतीने किस आणि हार्ट इमोजी दिले आहेत. 7 वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये सलमान खान, संजय लीला भन्साळी, काजोल, तब्बू, यो यो हनी सिंगसह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. झहीर देखील एक अभिनेता आहे आणि त्याने 2019 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. झहीरचे वडील इक्बाल रतनसी दागिने आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आणि ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत. यामुळेच झहीरने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘नोटबुक’मधून सुरुवात केली. झहीरची बहीण सनम रतनसी ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलताना, अभिनेत्री तिच्या पतीसोबत ‘तू है मेरी किरण’ या आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करण्यास तयार आहे. याआधी सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे? Read More »

1000023602

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Maharashtra Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटापाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे या जागेवर कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागू आहे. माहितीनुसार, महायुतीच्या 24 आणि महाविकास आघाडीच्या 33 जागांवर निर्णय होऊ शकलेला नाही. महाआघाडीत आघाडी वाढवण्यासाठी भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर काँग्रेस-शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संतुक मारोतराव हुंबर्डे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसने दिवंगत खासदार रवींद्र चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. जो जास्त जागा जिंकतो तो मुख्यमंत्री होतोज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री होणार अशी अंतर्गत चर्चा म.वि. यामुळे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तीन घटक पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढवण्याचा करार झाला होता, मात्र काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) 84 जागांवर तर राष्ट्रवादीने (शरद) 76 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील सुमारे 15 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने काटेल जागेवर माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्राचे मुंबई-कोकण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईतील पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. भाजपने काल तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीच्या 21 जागांवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय (आठवले) आणि जनसुराज्य शक्ती पक्षासाठी सोडल्या आहेत. कलिना जागेवर आरपीआयने अमरजीत सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस Read More »

1000021644

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Maharashtra Police

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »

1000018577

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द

Iran Israel War : पुन्हा एकदा मध्य आशियावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलने शनिवारी पहाटे इराणवर हवाई हल्ले केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इराणवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या लष्करी कारवाई केली असं इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पश्चिम आशियातील इराण-समर्थित अतिरेकी गट – गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह – इस्त्रायलशी आधीच युद्धात असताना या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील सर्वांगीण युद्धाचा धोका वाढतो. इराणमधील लष्करी टार्गेटवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी एका पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणची सत्ता आणि त्याचे समर्थक 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर वारंवार हल्ले करत आहेत. त्यात इराणच्या जमिनीवरून थेट हल्ले समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही हा अधिकार आहे आणि उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी टार्गेटवर टार्गेट करून हल्ले केले, त्यामुळे मर्यादित नुकसान झाले. इराणच्या सशस्त्र दलाचे हे विधान सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर वाचण्यात आले, परंतु यादरम्यान हल्ल्यात झालेल्या नुकसानीशी संबंधित कोणतीही फोटो दाखवण्यात आली नाहीत. इराणच्या सैन्याने दावा केला की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मर्यादित केले आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द Read More »

1000018609

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक

Maharashtra Crime News: चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विठ्ठल पवार यांनी 24 ऑक्टोबर रोजी पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत असून मात्र आतापर्यंत घरी आली नसल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे, (वय 25) रा.कुक्कडवेढे, रा.चिचोंडी पाटील यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक Read More »