DNA मराठी

हायलाईट

sawedi plot scam police entry

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण

Sawedi land scam  – तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार स्थगित अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam  – सावेडी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात आता पोलिसांचीदेखील एन्ट्री झाली असून महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांनी वादी-प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत होऊ नयेत, अशा सूचनाही सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाचरणे यांनी तक्रार करताना “जमिनीच्या व्यवहारात अडथळे निर्माण केले जात आहेत” असा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, चौकशीवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत पाचरणे? या प्रकरणात पाचरणे हे शिरूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनीच ही पोलीस तक्रार दिली आहे. त्यांचा दावा आहे की, डायाभाई अब्दुल आजीज यांच्याकडून पारसमल शहा यांनी विकत घेल्याचा दावा केलाय, शहा  यांच्याकडून जनरल मुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार पाचरणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, या खरेदी खताच्या कायदेशीरतेवर संशय व्यक्त होत असून त्यावरच संपूर्ण वाद उद्भवला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (Sawedi land scam ) सावेडीच्या भूखंड नोंदणी प्रकरणाने नगर शहराला हादरवून सोडले आहे. तीन दशके झोपलेल्या कागदांनी अचानकच ‘जिवंत’ होण्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर) आणि २४५/ब २ (०.६३ हेक्टर) असा एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाचा भूखंड – ज्या जमिनीची ३५ वर्षांपूर्वी कोणतीही व्यवहार प्रक्रिया झाली नाही, ती अचानक नोंदणीसाठी समोर आली, या प्रकरणांमध्ये अजित दादाभाई आणि साजिद दयाभाई यांचे जनरल मुखत्यार म्हणून रमाकांत सोनवणे राहणार स्टेशन रोड अहिल्यानगर यांनी तक्रार केली आहे त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सावेडी भागातील एक भूखंड 1991 मध्ये खरेदी करण्यात आल्याचं खरेदी खत सादर करण्यात आलं आहे. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये ही नोंद करण्यात आली. त्यात काही बाबी संशयास्पद असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रांताधिकारी सुधीर पाटील अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही व्यवहार होऊ नये, असे पत्र देण्यात आले आहे .

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण Read More »

mjtaio radhika yadav split

Radhika Yadav – वडिलांकडून राष्ट्रीय टेनिसपटू राधिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली. गुरुग्राम | प्रतिनिधी  Radhika Yadav – हरियाणामधील उदयोन्मुख टेनिसपटू आणि आयटीएफ क्रमवारीत उल्लेखनीय स्थान पटकावलेल्या राधिका यादव (२५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुग्राम येथे घडली. न्यायालयाने आरोपी वडील दीपक यादव यांना शुक्रवारी एक दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. राधिका घरात नाश्ता तयार करत असताना, तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली. तपासानंतर, स्वतःची टेनिस अकादमी सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या राधिकाच्या यशावरून वडिलांना गावकऱ्यांकडून टीका सहन करावी लागत होती, अशी माहिती समोर आली आहे. “मुलीच्या कमाईवर जगतो,” अशा ताशेरे गावातून झेलावे लागल्यामुळे त्यांनी राधिकावर गोळी झाडण्याचा निर्णय घेतल्याची कबुली दीपक यादव यांनी दिली आहे. सुरुवातीस सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या की, रील्समुळे किंवा मुलीच्या वागणुकीमुळे ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी यावर स्पष्टपणे स्पष्टीकरण देत सांगितले की अकादमीशी संबंधित वाद व सामाजिक दबावच यामागील प्रमुख कारण आहे. राधिकाचा खेळातील प्रवास राधिका यादव हिने अल्पवयातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. या घटनेने क्रीडा व सामाजिक क्षेत्रात पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. एक यशस्वी मुलगी आपला व्यवसाय उभा करत असतानाही, तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिचं आयुष्य संपवलं, ही बाब धक्कादायक आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, वापरलेली बंदूक, उर्वरित काडतुसे, तसेच राधिकाच्या आईची साक्षही घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Radhika Yadav – वडिलांकडून राष्ट्रीय टेनिसपटू राधिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते?

Sawedi land scam – अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या सावेडी भागातील गाजत असलेल्या भूखंड नोंदणी प्रकरणाने सध्या शहराचे नुसते कान नव्हे तर अंत:करण ढवळून काढले आहे. ३५ वर्षांपूर्वीचा खरेदीखत, पावर ऑफ अ‍ॅटर्नी, हिबाबनामे आणि नोटरीच्या नोंदी आज अचानक कोणाच्या तरी मृत्यूमुळे बाहेर येतात आणि सर्वांनी ‘हे माझं’, ‘मी याचा वारस’, ‘ते माझं’ म्हणून उचल खाल्ल्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात. मग इतके दिवस हे सगळे नक्की कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? हे केवळ प्रश्‍न नाही; हा एका प्रामाणिक व्यवस्थेच्या मरणाचाही हुंकार आहे. एखादा वारसदार मरण पावतो आणि त्या पाठोपाठ एकामागोमाग एक भूमाफिया, कागदांचे माहेरघर बनलेले दस्तऐवज, खोटी पावती आणि सरकारी यंत्रणेतील बेशरम शांतता यांचा भयंकर नाट्यप्रयोग सादर होतो. मग प्रश्न हा पडतो की नेमकी ही भूखंड माफिया कुणाच्या मरणाची वाट पाहत होते… सर्व्हे नं. २४५/ब १ आणि २४५/ब २ — एकूण १ हेक्टर ३५ आर — ही जमीन, ३५ वर्षांनंतर अचानक नोंदणीसाठी पुढे काढली जाते आणि म्हणे १९९१ साली खरेदीखत झाले होते! पण त्या काळात तर २४५/ब २ हा गट क्रमांक अस्तित्वातच नव्हता. गट विभाजनच १९९२ मध्ये झाले, तर वर्षभर आधी खरेदीखत लिहिणाऱ्यांनी कोणते गूढ भविष्य पाहिले होते?याहून भयावह म्हणजे हे खरेदीखत लिहून देणारा ‘अब्दुल अजीज डायभाई’ — त्याच्या नावावर त्या काळात जमीनच नव्हती! मग हे सगळे “खरे” दस्तऐवज तयार झाले तरी कसे? की काहीजणांची सही, काहीजणांचा मृत्यू, काहीजणांची आठवण आणि काहीजणांचे स्वार्थ — हे सगळं एकाच ‘खता’त गाडलं गेलं? या सगळ्या खेळात सर्वात मोठा खलनायक ठरतो तो म्हणजे – ‘गप्प बसलेली यंत्रणा‘. निबंधक, महसूल कार्यालयाला हे प्रश्न पडत नाहीत का? की त्यांनाही या बनावट दस्तऐवजांचं वजन लक्ष्मी-दर्शनाच्या तुला मोजूनच समजतं? अहो तुम्ही आज अधिकारी असला म्हणून काय झालं शेवटी तुम्हीही एक माणूस आहात हे विसरू नका, या प्रकरणात फक्त जमीनच लुटली जात नाहीये, तर नीतिमत्तेची हत्या, कायद्याचा अपमान आणि सामान्य जनतेच्या विश्वासाचा खून झालेला आहे. अशी सडकी व्यवस्था चालू राहिली, तर उद्या तुमच्या-आमच्या जमिनीही कुणाच्या तरी “काही वर्षांपूर्वी”च्या खरेदीखतावर हरवल्या जातील. त्यावेळेस तुमची पुढील पिढी ही अधिकारी नसेल हे लक्षात ठेवा, प्रशासन आणि कायदा यंत्रणांनी आता तरी जागं व्हावं, अन्यथा जनता विचारेल — हे सगळे खरेदीखत, नोटरी, हिबाबनामे फक्त माणसाच्या मरणाची वाट पाहूनच बाहेर काढायचे का? आता कुणी मरेल याची वाट न पाहता, कायदा जिवंत आहे हे दाखवून द्या. नाहीतर पुढची वाट फक्त अराजकतेकडेच जाते. * हे सगळे पुढे आले याचे कारण पुण्यात दोन-तीन महिन्यापूर्वी एका वर्षाचे निधन झाले.*

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? Read More »

sawedi land

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष?

land Scam Sawedi – अहिल्यानगर : सावेडी येथील तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात नवे वळण आले आहे. या प्रकरणात बनावट खरेदीखताच्या आधारे पुन्हा एकदा नवीन खरेदीखत करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी आर्थिक आमिषाचे – ‘लक्ष्मी दर्शनाचे’ – प्रस्ताव दिल्याचेही समजते. सदर प्रकरणात २४५/ब२ या गट क्रमांकाची ०.६३ हेक्टर क्षेत्राची जमीन चर्चेचा विषय ठरली आहे. या भूखंडावर ३५ वर्षांपूर्वीचे खरेदीखत खरे की बनावट, याचा तपास सुरू असतानाच, त्याच खरेदीखताच्या आधारे नवी नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित पक्षांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नोंदणीसाठी दबाव आणल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेत अडथळा नको म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मी दर्शन’ देण्याचे सुचवले गेल्याचे संकेत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी यंत्रणेवर बाह्य हस्तक्षेपाचा गंभीर प्रकार म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू केली असून, मंडळ अधिकारी शैलजा देवकते यांनी वादी-प्रतिवादी पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या गट नंबरवरील कोणताही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावा, असे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधकांना दिले गेले आहेत. या सर्व घडामोडींमुळे भू-माफियांची धडकी भरली असून, प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रकार आणि त्याला मिळणारी शासकीय यंत्रणांची साथ, या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष? Read More »