DNA मराठी

हायलाईट

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »

himachal pradesh accident

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता भागात एका प्रवासी बसला भूस्खलनाचा धक्का बसला. बसवर डोंगराचा ढिगार कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनएरएफ) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल दुःख व्यक्त केले आणि बचाव पथकांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू Read More »

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

coldrif syrup death case

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा

Coldrif Syrup Death Case: मध्यप्रदेशात रासायनिक अयोग्यता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बनवलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 16 मुलांचा मृत्यू झाला असल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्यावर छापा टाकला. तपासणीत निकृष्ट दर्जाची परिस्थिती आणि बेकायदेशीर पद्धती आढळून आल्या. निरीक्षकांना प्लास्टिक पाईप्समधून गळणारे रासायनिक अवशेष, गंजलेली यंत्रसामग्री आणि संरक्षक उपकरणे नसलेले कामगार औद्योगिक रसायने हाताने मिसळत असल्याचे आढळले. कारखान्यात प्रशिक्षित केमिस्ट नव्हते आणि उत्पादनादरम्यान कोणतीही गुणवत्ता चाचणी घेण्यात आली नाही. औद्योगिक रसायनांपासून बनवलेले कोल्ड्रिफ कफ सिरप सूत्रांनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ग्लायकॉलसारखी औद्योगिक रसायने स्थानिक वितरकांकडून रोख रकमेत किंवा गुगल पे द्वारे खरेदी केली गेली. कागदपत्रे टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपासणी अहवालात असेही उघड झाले की कारखान्याने औद्योगिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल वापरले होते, ज्याची डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारख्या संभाव्य हानिकारक दूषित घटकांसाठी चाचणी केली गेली नव्हती. प्रिंटिंग इंक, अॅडेसिव्ह, ब्रेक फ्लुइड आणि ल्युब्रिकंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या डायथिलीन ग्लायकॉलमुळे मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान झाले. तपासणीत असे आढळून आले की SR-13 बॅचमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त आहे. तपासणीत असे आढळून आले की: कोणतीही औषधोपचार यंत्रणा नव्हती, म्हणजेच कोणीही दुष्परिणामांचे निरीक्षण केले नाही किंवा रिकॉल केले नाही. उत्पादनादरम्यान कोणतेही प्रशिक्षित केमिस्ट उपस्थित नव्हते. गुणवत्ता चाचणीशिवाय कच्चा माल वापरण्यात आला. अज्ञात स्त्रोतांकडून पाणी मिळवण्यात आले आणि शुद्धतेसाठी चाचणी केली गेली नाही. कारखान्यात एअर हँडलिंग युनिट्स, HEPA फिल्टर्स, वेंटिलेशन, कीटक नियंत्रण किंवा सुरक्षा नोंदींचा अभाव होता. तपासणीत 39 गंभीर आणि 325 प्रमुख उल्लंघने उघड झाली, ज्यात कीटकांचा प्रादुर्भाव, उघडे गटार, तुटलेली उपकरणे आणि एअर फिल्टरचा अभाव यांचा समावेश आहे. SR-13 बॅचचा विनाशकारी परिणाम मे 2025 मध्ये उत्पादित आणि एप्रिल 2027 पर्यंत वैध असलेली SR-13 बॅच अनेक महिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बाजारात मुक्तपणे फिरत होती. या बॅचचे सेवन केल्यानंतर चिंदवाडा येथील अनेक मुलांना तीव्र मूत्रपिंड निकामी झाले. सोळा मुलांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील होते. रेस्पोलाइट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन सारख्या इतर सिरपची चाचणी घेण्यात आली आणि ते सामान्य दर्जाचे असल्याचे आढळले. देखरेख आणि जबाबदारीचा अभाव तपासात असे दिसून आले की हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता तर एक पद्धतशीर बिघाड होता. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीने स्रेसन फार्मास्युटिकल्सची उत्पादन प्रक्रिया थांबवली आणि सर्व साठा गोठवला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तिचा परवाना निलंबित करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि एका उपसंचालकांना निलंबित केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली, तर चिंदवाडा येथील एका डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

kotwali police

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »