DNA मराठी

क्राईम

पत्रकारास शिवीगाळ,

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकीतोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करणार अहिल्यानगर – शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक फौजदार टाईम्स चे कार्यकारी संपादक अन्सार राजू सय्यद (वय 51, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना कार्यालयीन आवारात शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बलभिम सानप या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून कलम 351(2), 352 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. घटनेची पार्श्वभूमीफिर्यादी अन्सार सय्यद हे राज चेंबर्स, कोठला येथे असलेल्या आपल्या कार्यालयात नियमित हजेरी लावतात. त्यांच्या कार्यालयासमोरच आरोपी बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास फिर्यादींचा ओळखीचा गणेश उरमुले हा कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आला होता. भेटीच्या दरम्यान उरमुले यांनी इमारतीतील शौचालय वापरले. यानंतर सानप यांनी उरमुले यांना बोलावून “तू लघवी केली आहेस, टॉयलेट धुवून घे” असे सांगितले. उरमुले हे पाणी घेऊन टॉयलेट धुण्यास जात असताना सानप यांनी पुन्हा हाक मारून “तू लघवीला तिकडे का गेला?” असे विचारत चापटी मारून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पत्रकार व मुलाला देखील धमकीही घटना फिर्यादींनी कार्यालयातून पाहिली व त्यांनी सानप यांना ओरडले की, उरमुले टॉयलेट धुवून देतील, मारू नका. यावेळी फिर्यादींचा मुलगा अमन सय्यद हा देखील तिथे गेला व दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविला. यानंतर, पार्किंगमध्ये असताना सानप यांनी अन्सार सय्यद यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्का बुक्की केली, “तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झाला का? तुमची लायकी काय आहे मला माहित आहे,  मी चांगल्या-चांगल्यांना कामाला लावले आहे, आता पुढचा नंबर तुझा” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. या प्रकरणी तोपखाना पोलीस्थाण्य्त गुन्हा दाखल,फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा क्र. 832/2025 दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्याकडे दिला आहे. गुन्हा बीएनएस 351(2) व 352 या कलमांखाली नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून रोजनाम्यात नोंद केली आहे. या घटनेने पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पत्रकार संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

stock market

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर

Stock Market : शेअर मार्केटच्या फसवणुकीतून सामान्य माणसांच्या पैसे बुडवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर मुंबईत खाते सुरू करून, त्या खात्यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपी कवडे यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जवळपास एक कोटी रुपयांची लाच ऑनलाइन घेतली अशी माहिती आहे. मयत व्यक्तीच्या नावाचे खाते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचे होते. पोलीसांनी बँकेतून ही रक्कम इतर ठिकाणी पाठवून, नंतर ती कॅश करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीसाची नियंत्रण कक्षात बदली झाली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरत आहे. शेवगाव-पाथर्डी परिसरात झालेल्या या घोटाळ्यात लोकांना जास्त परतावा मिळेल असे सांगून फसवले गेले. अंदाजे 1500 हजार ते 2000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती उध्वस्त झाली आहे. मी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्या होत्या, तेव्हा परिस्थिती खूपच भयानक होती. काहींनी जमीन विकून पैसे गुंतवले, काहींनी तर बँकेतून कर्ज काढले तर यामध्ये मोल मजुरी करणाऱ्या महिलांनीही पैसे लावलेले आहेत तर काही दोन्ही भांडे करणाऱ्या महिलांनी मुलांसाठी ठेवलेली रक्कमही या ठिकाणी गुंतवली आहे, काहींनी कुटुंबाचे राखीव पैसे घालून शेअरमध्ये गुंतवले, तर काहींनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे पण वापरले. अनेक कुटुंबांना आज आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटाळ्याच्या काळात पोलीस केस न घेता पाहत राहिले, अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोक पोलीस ठाण्यात येत होते, पण पोलीस का गप्प होते, हे उत्तर मला जवळपास वर्षभरांनी कळले. एकीकडे सामान्य कुटुंब संपत चालले आहेत, तर दुसरीकडे त्याच प्रकरणात पोलीस कोट्यावधी रुपयांची लाच घेत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे “काय होणार यावर? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” स्थानिक कार्यकर्ते देखील ठाम आहेत. ते म्हणतात, “फक्त नियंत्रण कक्षात बदली करून काय होणार? अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे!” असा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. शेवगाव-पाथर्डीतील शेअर मार्केट घोटाळा प्रकरण आता केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणी पोलीस प्रशासनाच्या जवाबदारीचा सत्यपरिक्षण बनले आहे.

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर Read More »

img 20250813 wa0015

Ahilyanagar News : आरोपींची निर्दोष मुक्तता : प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणातून भळगट यांची सुटका

Ahilyanagar News : अन्न व औषध प्रशासनाने १५ ऑक्टोबर २०२० रोजी अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करत जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणात व्यापारी शुभम रमणलाल भळगट (वय २४, रा. शेरकर गल्ली, तेलीखुंट) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात दोष सिद्ध न झाल्यामुळे भळगट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. सदर प्रकरणात मधुकर पवार (वय ३३), अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून कारवाईची नोंद झाली होती. फिर्यादीनुसार, १३ लाख ९१ हजार ७२९ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा शुभम जनरल स्टोअर्समधून मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. फिर्यादीत शुभम भळगट यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवले हिरा पान मसाला, सुगंधित तंबाखू ,गोवा,वी 1 तंबाखू , राजश्री पान मसाला असल्याचा आरोप होता. तसेच त्यांनी पुरवठादाराची माहिती न दिल्याचे आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा २००६ तसेच भादंवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी यंत्रणेकडून आरोप सिद्ध करण्यास आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने, आणि कारवाईतील प्रक्रियात्मक त्रुटींमुळे न्यायालयाने भळगट यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. स्नेहा लोखंडे यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला असून, जोशना ससाणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Ahilyanagar News : आरोपींची निर्दोष मुक्तता : प्रतिबंधित अन्नसाठा प्रकरणातून भळगट यांची सुटका Read More »

is the savedi land scam a clue to negligence or collusion in revenue records.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा?

Sawedi land scam – अहिल्यानगर तालुक्यातील मौजे सावेडी येथील स.नं. २४५ या जमिनीच्या नोंदी व खरेदी व्यवहाराचा मागोवा घेतला, तर एकाच वेळी अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. अपर तहसीलदारांच्या तपास अहवालातून समोर आलेला घटनाक्रम केवळ महसूल विभागातील बेपर्वाईचाच नाही, तर संगनमताचा संशयही दृढ करतो. १९९१ सालचा खरेदीदस्त क्रमांक ४३० हा व्यवहार, त्यानंतर झालेले वाटप, चुक दुरुस्ती लेख, आणि २०२५ मध्ये अचानक ३४ वर्षांनी झालेला फेरफार — हे सर्व दस्तऐवज पाहता कायदेशीर प्रक्रियेतले पायऱ्या जाणीवपूर्वक टाळल्याचे स्पष्ट दिसते. महसूल कायद्यानुसार खरेदी देणारा आणि घेणारा या दोघांना कलम १५०(२) नुसार नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, येथे ना टपालाद्वारे नोटीस पाठवली, मलामत्तेवर नोटीस लावली, ना ग्रामपंचायतीमार्फत प्रसार केला. त्याऐवजी अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करण्याची “तातडी” दाखवली गेली. प्रश्न असा की — या तातडीमागे फक्त अधिकारी बेपर्वाई होती का, की काहींचा फायदा करून देण्याची जाणीवपूर्वक धडपड? सदर जमिनीची स्थिती १९९२ च्या फेरफार क्रमांक १४६७६ नुसार स्पष्ट होती. अब्दुल अजीज दायाभाई यांना ०.७२ हे.आर. तर दायाभाई अब्दुल अजीज यांना ०.६३ हे.आर. असे वाटप झाले होते. तरीदेखील खरेदीदस्तात संपूर्ण १.३५ हे.आर. क्षेत्राचा उल्लेख करून, वाटपापूर्वीचे आणि नंतरचे गट क्रमांक मिसळून विक्री दाखवण्यात आली. म्हणजे, नोंदीतील आकडेवारी आणि प्रत्यक्ष वाटप यात उघड विसंगती निर्माण झाली. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे १९९१ सालचा दस्त प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला की नाही, याबाबतच अद्याप खात्री नाही. अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर, डे बुक यांसारखी आवश्यक मूळ नोंदीच उपलब्ध नाहीत. दस्त वैध आहे की बनावट, हे ठरवण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर आधारित फेरफार मंजूर केला. ही केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर थेट कायद्याच्या गळचेपीसारखी बाब आहे. अहवालात नमूद केलेल्या समांतर प्रकरणांतून एक धोकादायक पॅटर्न समोर येतो — ३०-३५ वर्षे जुने खरेदीदस्त, ज्यात विक्रेते-खरेदीदार दोघेही मृत, आणि मग वारसदार किंवा इतर लाभार्थी अचानक विलंब माफी अर्जासह अपील दाखल करतात. अनेकदा हे दस्त बनावट असल्याचे विरोधी पक्ष सांगतो. महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अशा संशयास्पद फेरफारांना संमती मिळते आणि जमिनीच्या मालकीत दीर्घकाळानंतर ‘कायदेशीर’ फेरबदल होतात. सावेडी प्रकरण हा फक्त एक तुकडा आहे. पण तो आपल्याला महसूल नोंदी व्यवस्थेत खोलवर रुतलेल्या दोषांचे दर्शन घडवतो. अधिकारी जबाबदारी टाळतात, नियम मोडले जातात, आणि परिणामी काही हातांना कोटींच्या जमिनी सहज मिळतात. अशा प्रकरणांवर कठोर चौकशी होऊन जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. अन्यथा, जमीन माफियांच्या जाळ्यात अडकलेली महसूल यंत्रणा सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांसाठी न्यायालयीन लढ्याचं रणांगण बनून राहील. सावेडीचा धडा स्पष्ट आहे — महसूल नोंदी ही केवळ सरकारी कागदपत्रं नाहीत, तर त्या प्रत्येक गावाच्या मालमत्तेचा इतिहास असतात. त्या इतिहासात खोटा अध्याय लिहू देणं म्हणजे आपल्या भूमीच्या अस्मितेवरच गदा आणणं होय. १. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, सावेडी 1 – चूक: ३४ वर्षांपूर्वीचा खरेदीदस्त तपासणी न करता, ७/१२ वरील वास्तविक नावे व दस्तातील नावे पडताळणी न करता, चुकीची नोंद फेरफार क्र. ७३१०७ मध्ये घेतली. २ – गंभीर मुद्दा: कलम १५०(२) नुसार खरेदी देणारा आणि घेणारा (किंवा त्यांचे वारसदार) यांना नोटीस देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. संशय: एवढ्या जुन्या प्रकरणात अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करून ‘तातडी’ दाखवली गेली. २. तत्कालीन मंडळाधिकारी, सावेडी 1- चूक: ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नोंदीची कोणतीही चौकशी न करता मंजुरी देणे. २ – गंभीर मुद्दा: दस्त वैध आहे का, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद झाला का, याबाबत कोणतीही खातरजमा केली नाही. ३. दुय्यम निबंधक कार्यालय, अहमदनगर क्र. १ (दक्षिण) 1 – चूक: १९९१ चा दस्त क्रमांक ४३० नोंदवला गेला का, याबाबतची मूळ रजिस्टर, अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर इ. अभिलेख अनुपलब्ध. २ – गंभीर मुद्दा: दस्त नोंदणीचा पुरावा पूर्ण नसताना महसूल कार्यालयाला स्पष्ट माहिती न देणे. ३ – संशय: जर हा दस्त बनावट किंवा अपूर्ण नोंद असलेला असेल, तर त्याची त्वरित नोंद महसूल विभागाला देणे अपेक्षित होते. ४. खरेदी घेणारे – पारसमल मश्रीमल शाह 1 – चूक/भूमिका: ३४ वर्षांनंतर अचानक फेरफार अर्ज दाखल करणे, तेही मूळ व्यवहारातील पक्षकार (खरेदी देणारे) मृत झाल्यानंतर. २ – संशय: एवढ्या मोठ्या विलंबानंतर जमीन आपल्या नावावर घेण्याचा प्रयत्न, तोही सर्व कायदेशीर प्रक्रिया टाळून. ५. खरेदी देणाऱ्यांचे वारस/संबंधित पक्ष थोडक्यात दोष 1 – थेट प्रशासनिक जबाबदारी: तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी (नोंदीची तपासणी व मंजुरी). २ – नोंदणी प्रक्रियेतील कमतरता: दुय्यम निबंधक कार्यालय. ३ – संभाव्य संगनमत: काही वारस व अधिकारी यांचा फायदा घेण्याचा व्यवहार.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा? Read More »

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद

Ahilyanagar News : मानवी हक्कांचा भंग करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुरुडगाव परिसरात छापा टाकून तब्बल दोन वर्षांपासून कैदेत ठेवून गोठ्यात जबरदस्तीने काम करण्यास लावण्यात आलेल्या तीन वेठबिगारांची सुटका केली. या प्रकरणी जाकिश उर्फ बबड्या काळे (वय 35, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद आणि बळजबरीचे वास्तव तपासानुसार, अटक आरोपीने एक कामगार नागपूरहून तर दोन कामगार उत्तर प्रदेशहून आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना आपल्या घराशेजारील गायीच्या गोठ्यात कैद करून ठेवले होते. बाहेर जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कामगारांवर सतत लक्ष ठेवून, मारहाण करत व धमकावत त्यांच्याकडून गोठ्यातील कामे करवून घेतली जात होती. या काळात पीडितांना मोबदला न देता केवळ जेवणापुरतेच सोय करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खात्रीशीर माहितीवर छापा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना आरोपीकडे तीन जणांना बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकाने बुरुडगाव परिसरातील आरोपीच्या घरावर छापा टाकून तिघांना सुरक्षितपणे मुक्त केले. पीडितांची ओळख सुटविण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी एक जण नागपूरचा आहे, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आरोपीने त्यांना वेठबिगार म्हणून आणले होते आणि दोन वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याशिवाय, जबरदस्तीने काम करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 370 (मानव व्यापार), 342 (बेकायदेशीर कैद), 323 (मारहाण), 506 (धमकी) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा सहकारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पीडितांना पोलिस संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगार प्रथेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारचे प्रकरणे उघड करण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद Read More »

stock market scam the shadow of stock market scam and allegations of bribery

Stock market scam – शेअर मार्केट घोटाळा आणि ‘लाचखोरी’च्या आरोपांचे सावट

Stock market scam – अहिल्यानगर – शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेअर मार्केट घोटाळा ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर सामाजिक आणि नैतिक पातळीवरचा गंभीर विश्वासघात आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त केली. बँकेतील ठेवी, सोनं, जमिनी, विवाह व शिक्षणासाठी साठवलेले पैसे – सगळे पैसे काढून नागरिकांनी लोभाच्या आमिषाखाली आपलं भविष्यच पणाला लावलं. मोठ्या व्याजाचे स्वप्न दाखवून आरोपींनी केवळ पैशांचा नव्हे, तर लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतला. व्यापारी पेठा सुमारे २५ टक्क्यांनी ठप्प झाल्या, स्थानिक अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला. शासन व प्रशासनाकडे वारंवार धाव घेतल्यानंतरच गुन्हा नोंदवला गेला. परंतु, गुन्हा नोंदवल्यानंतरच एक नवा वाद पेटला – एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने, एका पोलिसाने ऑनलाइन एक कोटी रुपयांची लाच घेतल्याची चर्चा जोर धरू लागली. हे आरोप सत्य-असत्य असले तरी, अशा चर्चेमुळे लोकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होतो. फसवणूक प्रकरणात न्याय मिळेल, अशी जी आशा नागरिकांनी ठेवली, ती अशा आरोपांमुळे अशा संपत चाली आहे. या प्रकरणातील खरे गुन्हेगार कोण, प्रशासनातील कोण कोण यात सामील होते, आणि लाचखोरीच्या चर्चेमागचं सत्य काय – हे सर्व तपासून पारदर्शकतेने जनतेसमोर मांडणं हे शासन आणि पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे. अन्यथा, ‘गुन्हेगारांना संरक्षण’ अशी जनमानसातील भावना आणखी बळावेल. लोकांच्या मेहनतीचा पैसा आणि भावनांचा गैरवापर करून आर्थिक ‘सुनामी’ घडवणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षा आणि भावी काळात अशा प्रकारांना आळा घालणारी व्यवस्था उभी करणं हा एकमेव उपाय आहे. कायदा आणि प्रशासनातील विश्वास पुनर्स्थापित करणं आजची अत्यावश्यक गरज आहे.

Stock market scam – शेअर मार्केट घोटाळा आणि ‘लाचखोरी’च्या आरोपांचे सावट Read More »

sawedi land scam a dark shadow over the records of the secondary registrar's office

सावेडीचा संशय: दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींवर काळी छाया..

अहिल्यानगर – जमिनीच्या नोंदीतले संशयास्पद व्यवहार, हरवलेल्या कागदपत्रांचा गूढ मागोवा, आणि वर्षानुवर्षे चालणारा ‘खात खरेदी’चा खेळ… सावेडीच्या दुय्यम निबंधक क्र. १ (दक्षिण) कार्यालयाचा हा इतिहास जणू एखाद्या गुन्हेगारी कादंबरीसारखा वाटावा असा आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत या कार्यालयातून झालेल्या अनेक खरेदी खातांवर आता संशयाच्या भावऱ्यात आहेत . नोंदी तपासताना असे दिसते की काही खात व्यवहार अतिशय घाईघाईत, कागदपत्रांची पूर्ण पूर्तता न होता, आणि संबंधित महसूल विभागाच्या प्रक्रियेची शिस्त न पाळता पूर्ण करण्यात आले. यामध्ये काही व्यवहारांची मूळ फाईलच गायब असल्याचा आरोप आहे. ही फाईल गायब होणे ही केवळ “कार्यालयीन चूक” की ठरवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न — हा प्रश्न गंभीर आहे. DNA मराठीच्या शैलीत विचारला तर —सरकार, तुमचे नोंदणी व मुद्रांक विभागातील गुप्तहेर काय करत होते?महसूल अधिकारी आणि निबंधक यांची भूमिका केवळ कागदावर सही करणारी होती का, की “सर्व काही ठीक आहे” अशी मान्यता देणारी? या संशयास्पद व्यवहारांतून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असावेत, असे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. काही जमीनमालकांच्या मते, भूमाफिया आणि दलाल यांची सांगड, कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जमिनीच्या नोंदीत फेरफार करून “कागदावर मालक” बदलण्यात आली. प्रश्नांची रांग: सध्या चौकशीची गाडी सुरू झाली आहे, मात्र तिचा वेग सरकारी यंत्रणेसारखाच — संथ. चौकशी संपेपर्यंत काही भूमाफिया, दलाल व अधिकारी यांची सांगड असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर जोर धरत आहे. दस्त हरवणे, नोंदी गायब होणे, व्यवहारात घाई करणे, आणि संबंधितांची पडताळणी न होणे – या सगळ्या गोष्टी संशयाला खतपाणी घालत आहेत. “जमीन ही मालमत्ता नव्हे, तर सोन्याची खाण” या मानसिकतेतून जणू काही व्यवहारांचा मेळ बसवला गेल्याची चर्चा रंगली आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक ‘बडी माशा’ जाळ्यात अडकण्याची शक्यता सूत्रांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. मात्र आतापर्यंत या चौकशीला ‘फाईल फिरवणं’ एवढंच महत्त्व दिलं गेल्याने, कारवाई खरंच होईल की, हा आणखी एक ‘कागदी वादळ’ ठरेल, असा संशय नागरिकांत आहे. महत्त्वाच्या फाईल्स पुराव्याच्या स्मशानात जाऊ नयेत, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. सरकारने जर खरंच सावेडीच्या संशयाचा शेवट करायचा असेल, तर या चौकशीला धारदार दात आणि टोकदार नखं लावावी लागतील. अन्यथा हा प्रकारही महाराष्ट्राच्या जमीन घोटाळा इतिहासात आणखी एक “प्रकरण संपले” म्हणून नोंदवला जाईल.

सावेडीचा संशय: दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींवर काळी छाया.. Read More »

sawedi land case – missing records, fake signatures, yet rush to sell

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई…

अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam – सावेडीतील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरण चौकशीच्या टप्प्यात असतानाच विक्रीची घाई सुरू असल्याने महसूल प्रशासन आणि निबंधन यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तीन गंभीर प्रश्न प्रशासनासमोर कायम आहेत – गायब झालेल्या नोंदी सापडणार का? बनावट सह्या सिद्ध होणार का? आणि अखेर हा व्यवहार कायदेशीर ठरणार का? १९९१ च्या खरेदीखताच्या आधारे २४ एप्रिल २०२५ रोजी खरेदीदार पारसमल मश्रिमल शहा यांनी नोंद घेण्याचा अर्ज दाखल केला. चार दिवसांत फेरफार नोंद घेऊन १७ मे २०२५ रोजी तत्कालीन मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी ती मंजूर केली. त्यानंतर तक्रारदार सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि प्रकरण मंडल अधिकाऱ्यांच्या चौकशीत गेले. चौकशीत शहा यांचे जनरल कुलमुखत्यारपत्रधारक गणेश शिवराम पाचरणे यांनी सुरुवातीला खुलासा देण्यास नकार दिला, मात्र अप्पर तहसीलदारांकडे सुनावणीदरम्यान अचानक “चूक दुरुस्ती लेख” सादर केला. हा दस्त आधीपासून अस्तित्वात असतानाही सुरुवातीला त्याचा उल्लेख न होणे, संशयाला अधिक वाव देणारे ठरले आहे. याशिवाय, १९९१ च्या मूळ खरेदीखतातील एका साक्षीदाराने “सही माझी नाही” असा दावा केला, तर १९९२ च्या चूक दुरुस्ती लेखातील दुसऱ्या साक्षीदारानेही “मी कधी सहीच केलेली नाही” असे स्पष्ट सांगितले. म्हणजेच, दोन्ही दस्तऐवजांवरील सह्यांच्या वैधतेवरच मोठा प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, सह दुय्यम निबंधक वर्ग २, अहिल्यानगर क्र.१ (दक्षिण) कार्यालयातील तपासणीत दस्त क्र. ४३०/१९९१ संदर्भात फक्त ‘खंड क्र. १९६’ उपलब्ध झाला आहे. सुची क्र. २, अंगठा-पुस्तक, डे बुक, पावती पुस्तक यांसारखी मूलभूत नोंदवही अद्याप सापडलेली नाही. त्या हरवल्या, लपवण्यात आल्या की कधी तयारच झाल्या नाहीत, हे अजूनही अज्ञात आहे. मात्र, इतक्या गंभीर विसंगती व चौकशी सुरू असतानाही संबंधित जमिनीची विक्री सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल विभाग व निबंधन यंत्रणेसमोर हे मोठे आव्हान असून, चौकशी आणि निर्णयाआधी विक्री थांबवणे हा त्यांचा कस लागणारा कसोटीचा क्षण ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की – गायब नोंदी शोधल्या जातात का, बनावट सह्यांचे रहस्य उलगडते का, आणि अखेर हा व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसतो का? की सर्व प्रश्न अनुत्तरित राहून पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याला मोकळा रस्ता मिळणार? इथे मी तुमच्यासाठी धारदार, पॉइंट-बाय-पॉइंट स्वरूपात बातमी तयार केली आहे — वाचकाला थेट धक्का देणारी आणि शंका निर्माण करणारी: जमीन व्यवहाराचा गूढ – प्रश्नच प्रश्न!

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई… Read More »

state excise department

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 19 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई करत १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ व ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार मार्केट यार्ड पुणे तसेच शेलपिंपळगाव ता. खेड व आंबी ता. मावळ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ५ वाहनांसह ३ हजार २२० लिटर गावठी हातभट्टी दारु असा एकूण १९ लाख ७१ हजार २०० रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी वाय.एम.चव्हाण, ए.डी. गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर साबळे संजय साठे, जवान सर्वश्री. अहमद शेख, भरत नेमाडे, चंद्रकांत नाईक, विजय भानवसे अमर कांबळे, अनिल दांगट, जी. बी. माने, जयदास दाते. जगन्नाथ चव्हाण व महिला जवान अक्षदा कड, जवान नि वाहन चालक प्रमोद खरसडे व शरद हंडगर यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या निर्मिती, विक्रीमुळे महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याबाबत कोणास माहिती मिळाल्यास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ ताडीवाला रोड, पुणे व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक ३, तळेगाव दाभाडे ता. मावळ, या पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक देवदत्त पोटे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Pune Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 19 लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »