DNA मराठी

क्राईम

crime

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका…

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस जंगलात तिला ठेवत तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरीत घडली आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्या आक्रमक झाले असून गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. यामुळे राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. कॉलेजला जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती मात्र ती परतलीच नाही. या मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक साह्याने पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती अशी की घटनेतील आरोपीने नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला जवळील परिसरात मुलीला अपहरण करून घेऊन गेला होता. यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आणि तीन जणांना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका… Read More »

Police

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा

Ahilyanagar Police: अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी थेट अ‍ॅक्शन मोडवर जात खंडणीखोर आरोपीची भररस्त्यात वरात काढली आहे. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत बेड्या ठोकून फिरवण्यात आलं. या कारवाईमुळे संपूर्ण शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहरात. अखिल भारतीय कामगार सेनेचा नेता भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याची भररस्त्यात वरात काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला. काही दिवसांपूर्वी निंबळक एमआयडीसीतील सुयश मेटल प्रोसेसिंग या कंपनीत सदानंद सोनवणे, राजेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर प्रवेश करत दहशत माजवली होती. कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना काम बंद पाडण्याची धमकी देत, काम सुरू ठेवायचं असेल तर दरमहा एक लाख रुपये द्या, अन्यथा मालकाला जीवे मारू, अशी थेट धमकी देण्यात आली होती. याचवेळी 20 हजार रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर संतप्त उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत तक्रार दिली. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी सदानंद सोनवणे याला अटक केली. यानंतर सायंकाळी पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालय परिसरापर्यंत आरोपीची बेड्या ठोकून वरात काढण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे उद्योजकांमध्ये समाधानाचं वातावरण असून गुन्हेगारांमध्ये मात्र भीतीचं सावट पसरलं आहे. उद्योजकांना दिलासा… गुन्हेगारांना स्पष्ट संदेश अहिल्यानगर पोलीस आता थांबणार नाहीत!

Ahilyanagar Police : खंडणीखोराला भररस्त्यात बेड्या अन् उद्योजकांना दिलासा Read More »

police

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी 9.30 च्या सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावून काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती. त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. तसेच ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या वेळी सूचना दिली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा.एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.   जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक Read More »

Money 1

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा Read More »

Crime 1

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

fb img 1770982696869

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक !

Nevasa News : जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशाविरोधात उघडलेल्या मोहिमेअंतर्गत, नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी शसुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने प्रवरा नदीपात्रात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध साहित्य नष्ट केले. 3 टप्प्यात केलेली कारवाई नेवासा खुर्द (ज्ञानेश्वर मंदिर/लाडमोड टेकडी परिसर): प्रवरा नदीच्या काठावर 36 थर्माकोलचे चप्पू आणि 50 लाकडी बल्ल्या जप्त करून जागीच जाळून नष्ट करण्यात आल्या. दुसरी कारवाई: नदीपात्रातील अन्य एका ठिकाणी 4 थर्माकोलचे चप्पू नष्ट करण्यात आले. कापूर डोह: या भागात 4 चप्पू व 16 लाकडी बल्ल्या जाळून खाक करण्यात आल्या. दिवसभरात एकूण 44 तराफे/चप्पू आणि मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य नष्ट करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कारवाई दरम्यान बोटीमध्ये तांत्रिक बिघाड (पंक्चर) झाल्यामुळे खोल पाण्यातील कारवाई पूर्ण करता आली नाही, तरीही नदीकाठावरील आणि उथळ पाण्यातील अवैध साधनांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर प्रशासनाचा हा ‘वॉच’ असाच कायम राहणार असून दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरूच राहील.

Nevasa News : नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करांवर ‘प्रहार’ सुरूच; 44 तराफे व साहित्य जाळून खाक ! Read More »

kotla

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी

Kotla Crime : नगर शहरातील कोठला परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री गोळीबाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज चेंबर समोर बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाअकरा वाजता गोळीबार झाला. यात अबरार मुख्तार शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने, अबरारवर गोळीबार केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी Read More »

shani shingnapur

Shani Shingnapur: शनिशिंगणापूर देवस्थान अँप प्रकरण, 77 लाखांचा अपहार अन् 2500 पानांचे दोषारोपपत्र

Shani Shingnapur:  शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँप संदर्भातील सुमारे ५०० कोटीचा अपहार झालयाचा आरोप करण्यात आला होता. हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये ७७ लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. अपहार प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सुमारे ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.   संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. श्री शनैश्वर प्रसन्न शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या अँप करारातील संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात कोणताही तक्रारदार पुढे न आल्याने स्वतः पोलीस फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच अॅप मालक यांचे जबाब नोंदविले. विविध बँक खात्यांची तपासणी करून अपहारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले. मात्र, सखोल तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्रात ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. सायबर पोलिसांनी तपासाला गती देत देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान अँप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात जमा करावयाची रक्कम थेट काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायबर पोलिसांनी अँप मालकांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

Shani Shingnapur: शनिशिंगणापूर देवस्थान अँप प्रकरण, 77 लाखांचा अपहार अन् 2500 पानांचे दोषारोपपत्र Read More »

pune crime

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय?

Pune Crime: पुण्यात आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या ११ वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली तर १३ वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील वाघोली येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ रोड परिसरात ही घटना घडली आहे. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तिने आपला ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, कामानीनिमित्ताने ते वाघोली येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Pune Crime: पुणे हादरलं,आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव; कारण काय? Read More »

shevgaon

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल Read More »