DNA मराठी

क्राईम

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ

Pune Women Murder: राज्याची संस्कृती राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पुणे मधील बिबवेवाडी परिसरात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नाकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   बिबवेवाडी परिसरातील एका मंदिराजवळ पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिलेचे बिबवेवाडी येथील गोयाला गार्डनसमोर एक दुकान होते, ज्यात आयुर्वेदिक औषधांची विक्री होत असे. 9 डिसेंबर रोजी ही महिला नेहमीप्रमाणे दुकानात झोपण्यासाठी आली. त्याचवेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे पोहोचला आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांनी महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा सोडल्या. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी दिसली. पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडी ते चाकणपर्यंत 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. रविसिंग चितोडिया आणि विजय मारुती पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान दुचाकीवरून संशयित रविसिंगचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्याने विजय पाटीलचे नाव उघड केले. पोलिसांनी त्याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ Read More »

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही …..

Maharashtra Women Rape News : महाराष्ट्रातील एका विधवा महिलेसोबत राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने वर्षभर लैंगिक छळ सहन केला आणि कशीतरी त्या क्रूरांच्या तावडीतून सुटून थेट वर्धा जिल्ह्यात आली आणि तिने हिंगणघाट पोलिसांना आपला त्रास कथन केला.   हिंगणघाट शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ती इतर लोकांच्या घरात भांडी धुवून आपला उदरनिर्वाह करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी पीडित मंगला छाया नावाच्या महिलेच्या घरी भेटली. त्याने पीडितेला राजस्थानमध्ये घरगुती मदतीची गरज असल्याचे सांगून आमिष दाखवले. यासाठी निवास आणि भोजनाच्या सुविधांसोबतच तुम्हाला चांगले पैसेही मिळतील. त्यानंतर पीडित महिला मंगला आणि पूनमसह प्रथम राजस्थानमधील रतलाम गावात पोहोचली. तेथे आरोपीने स्टॅम्प पेपरवर त्यांची सही घेतली. तक्रारीनुसार, काही दिवसांनी शंकर राठोड आणि दिलीप राठोड त्या गावात पोहोचले. त्यांनी पीडितेचे आधार कार्ड आणि मोबाईल हिसकावून घेतला. शंकरने ते दोन लाख रुपयांना विकले. यादरम्यान तिचा लैंगिक छळ करण्यात आला. त्याचा छळ आणि मारहाणही होऊ लागली. सुमारे एक वर्ष हे सर्व सहन केल्यानंतर पीडितेने आईची तब्येत बिघडल्याचे सांगून तेथून पळ काढला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आनंदसह मंगला, पूनम, शंकर आणि दिलीप राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही ….. Read More »

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर

Madhi Devasthan : आज श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला.   समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली.  या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांच्या बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली असताना काही स्थानिक युवक पडले. अखेर या शाब्दिक चकमकीचे रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाले.  दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.  जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर Read More »

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा

Gutkha Ban – दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते  हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.  कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.  हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील उपस्थित झाला मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती काही बदलली नाही, यामुळे राज्यातील गुटखा बंदी हि फसलेली बंदी आहे. तसेच ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.  शाळा व महाविद्यालय परिसरातील गुटखा, तंबाखू अशा अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी कुलकर्णी यांनी नगर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची  घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता व याबाबत शिक्षक  आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे.  मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे तसेच सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सध्याची नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.  गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले… ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली मात्र कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही असे खंतही त्यांनी व्यक्त केली.  प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत.  संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा Read More »

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते. त्यांनतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी विशेष पथक नेमुण या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  या आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण  गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.  स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.  पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या प्रकरणातील आरोपी त्याचा आणखी एक साथीदारासह अहमदनगर शहरातील चांदणी चौक परिसरात येत आहे.  यानंतर या बातमीनुसार  पोलीस पथकाने चांदनी चौक येथे सापळा लावला आणि एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.  

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Police : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले असून या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,’कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,’एक मालवाहतूक ट्रक (एम.डब्लू.ए ३९४९) या गाडीत बेकायदा विनापरवाना दारूची वाहतूक होत आहे’ ही माहिती प्राप्त होताच गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी कायनेटिक चौकात सापळा लावून ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रॅकच्या कॅबिनमध्ये सात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.त्याच्या ताब्यातील १० लाख ५२ हजार ८०० रु. किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये वाहतूक ट्रक व देशी-विदेशी दारूचा सामावेश आहे. पो. कॉ. कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण सुखदेव लंके या ट्रक चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ.गणेश धोत्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही.. 

 Mumbai News: कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या रूममध्ये  महिलेचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानक संकुलात असलेल्या तृप्ती लॉजच्या एका रूममध्ये 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथील रहिवासी ज्योती तोडरमल असे महिलेचे नाव आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कल्याण शहरातील एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना रूममध्ये महिला संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडलेली आढळली. तर मृत महिलेचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. एमएफसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. शनिवारी दुपारी ज्योती या भूपेंद्र गिरी नावाच्या तरुणासोबत तृप्ती लॉजमध्ये आली होती. सकाळी बराच वेळ होऊनही रूमचा दरवाजा न उघडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर ज्योती मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तातडीने महात्मा फुले पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन  पोस्टमार्टमसाठी   पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी शनिवारी रात्री आठच्या सुमारास लॉजमधून बाहेर पडला होता. सामान घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे त्यांनी लॉज मालकाला सांगितले. मात्र तो परतला नाही. सध्या फरार असलेल्या भूपेंद्र गिरीवर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटले असताना याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृप्ती लॉजच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असल्याची माहिती आहे. सध्या ही हत्या का आणि केव्हा झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai News : तरुणासोबत लॉजवर आली होती महिला अन् सकाळी दरवाजा उघडताच घडलं असं काही..  Read More »

Maharashtra Accident

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत. केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सात जणांपैकी बहुतांश महिला आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. चिखली व देहूरोड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत फायर कँडल कंपनी जळून खाक झाली. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कॉम्प्लेक्सला वेढले. अशा परिस्थितीत तिथं काम करणा-या लोकांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू Read More »

मराठी बातम्या

मराठी बातम्या मराठी बातम्या ही दिवसभरातील ताज्या व गर्म बातम्या मिळवणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक, खेळ, मनोरंजन, व्यापार, विचार आणि इतर विविध विषयांवरील बातम्या मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला रोजच्या घडामोडीची जाणीव, राजकीय आणि आर्थिक बातम्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या, खेळाच्या जगातील घडामोडी, व्यापार, विचार, सामाजिक विषयांवरील बातम्या आणि इतर विविध विषयांवरील बातम्या मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला नवीनतम आणि ताज्या बातम्या मिळतात. या वेबसाइटवर आपल्याला राजकीय आणि आर्थिक विषयांवर ताज्या बातम्या मिळतात, ज्यामुळे आपण राजकीय विद्यार्थ्यांना आणि उद्योजकांना आर्थिक बातम्या वाचायला मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला विविध विषयांवरील बातम्या मिळतात. आपल्याला खेळ, मनोरंजन, व्यापार, विचार, सामाजिक विषयांवरील ताज्या बातम्या वाचायला मिळतात. खेळ विषयांवरील बातम्या आपल्याला खेळ प्रेमींना आणि खेळाच्या जगातील घडामोडी जाणून घेण्यास मदत करतात. मनोरंजन विषयांवरील बातम्या आपल्याला नवीनतम चित्रपट, टेलिविजन शो, संगीत, कला आणि अभिनयाच्या घडामोडी जाणून घेण्यास मदत करतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला सामाजिक विषयांवरील बातम्या मिळतात. या विषयांवरील बातम्या आपल्याला समाजातील बदलांची जाणीव देतात आणि आपल्याला त्या बदलांच्या विचारांसाठी प्रेरणा देतात. आपल्या आवडत्या विषयावरील बातम्या वाचायला मराठी बातम्या वेबसाइटला भेट द्या आणि ताज्या व गर्म बातम्या वाचा.

मराठी बातम्या Read More »