Dnamarathi.com

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.

 तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे. 

अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे. 

अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी

 तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *