DNA मराठी

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

IMG 20231230 WA0003

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे.

राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. 

या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.

नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *