DNA मराठी

क्राईम

Sukma Encounter: मोठी बातमी! पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 01 माओवादी ठार

Sukma Encounter : समोर आलेल्या माहितीनुसार, टेत्राई टोलनाईच्या जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.  येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांचे पथक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी निघाले. दरम्यान, घातपातात बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानावर अचानक गोळीबार केला.  नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना जवानांनीही जबाबदारी स्वीकारली आणि एकाला ठार केले. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एसपी किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. सैनिक परतल्यावरच माहिती मिळेल, असे ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात जवानांची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी, सुरक्षा दलांनी गरीबीबंदच्या कोडोमाली, इचराडी, गरीबा आणि सहबिंकछार गावांच्या जंगलात नक्षलवाद्यांचे मोठे लपलेले ठिकाण उद्ध्वस्त केले. सैनिकांनी गरीबीबंद आणि ओडिशाच्या सीमेला लागून असलेल्या शोभा पोलिस स्टेशनच्या जंगलातून तीन IEDs देखील जप्त केले.

Sukma Encounter: मोठी बातमी! पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 01 माओवादी ठार Read More »

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध

Ahmednagar News: न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्राथना केली.    नगर मधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी  असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.  तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास   खा. सुजय विखे  यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध Read More »

Ahmednagar News: युवा उद्योजकाला 07 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरूडगाव येथील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांना चाकूचा धाक दाखवून तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे नाहीतर तुझा मर्डर करून तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू आमच्या नादी लागू नको आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.  तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून तुला सळो की पळो करून सोडू असे म्हणत खंडणी मागणाऱ्या नेवासा तालुक्यातील महेश मच्छिंद्र जगताप (राहणार गेवराई, तालुका नेवासा) तसेच योगेश शिवाजी चावरे (राहणार नजीक चिंचोली, तालुका नेवासा) या दोन व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३८७ नुसार शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांनी शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेअर मार्केट ट्रेडिंग व शेती हा व्यवसाय करीत असून दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी मी माझ्या नजीक बाभूळगाव शिवारातील पपईच्या बागेत काम करत असताना महेश मच्छिंद्र जगताप तसेच योगेश शिवाजी चावरे   हे दोघे माझ्याजवळ हातात चाकू घेऊन आले व मला चाकू दाखवून म्हणाले की तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे तू खूप मोठा झाला आहे तू आम्हा दोघांना दर महिन्याला खंडणी स्वरूपात सात लाख रुपये हप्ता चालू कर तू जर आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुला सळो की पळो करून सोडू व तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून टाकू असे ते म्हटल्यावर मी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने ते जाताना मला म्हणाले की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत आमच्या नादी लागू नको तुला केव्हाच संपवून टाकू असे म्हणून ते निघून गेले परंतु भीतीपोटी मी तक्रार दाखल केली नाही.  त्यानंतर वरील दोघांनी शेवगाव पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासह इतर ११ कार्यालयात माझ्या विरोधात अर्ज दिले तसेच दिल्यानंतर नंतर त्यांनी मला वेळोवेळी फोनवर तसेच व्हाट्सअप कॉल वरती पैशाची मागणी केली तसेच पैशाची वेळेत पूर्तता न केल्यास तुला व तुझ्या फॅमिलीला संपवणार तसेच तुझ्या विरोधात आणखीन खोटे अर्ज करणार तसेच तू आमच्या विरोधात कोठेही कंप्लेंट कर आम्ही सर्व पोलीस मॅनेज केले आहेत असे धमकीचे मेसेज व्हाट्सअप वरती दिले.  तसेच पोलीस आमचे काहीच करू शकत नाही आमची एसपी ऑफिस पर्यंत सेटिंग आहे अशी देखील धमकी दिल्याने नेवासा तालुक्यातील दोन व्यक्ती विरोधात शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Ahmednagar News: युवा उद्योजकाला 07 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल Read More »

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त

Maharashtra News:- अकोला  जिल्ह्य़ातील व बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या  उरळ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई पोलीस स्टेशन उरळ हवदीतील ग्राम डोंगरगाव शिवार मन नदी पात्रात मोहा हातभटटी गावठी दारू वरती रेड करून एकूण ९६००० रू.चा मुददेमाल नाश करण्यात आला. ०७ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम डोंगरगाव येथील मन नदी पात्रामध्ये काही इसम मोह हातभटटी गावठी दारू काढत असल्याची माहीती मिळाल्यावरून आम्ही पोलीस. स्टॉप व पंच सह गावठी हातभटटीची दारू काढणारे इसमांवर रेड केली असता आरोपी नामे १) दादाराव सुलताने, २) गजानन पाखरे दोन्ही (रा. ग्राम डोंगरगाव) यांना पोलीसांची चाहुल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.  घटनास्थळाची पाहणी केली असता ४५ डब्बे (डब्यात) एकूण ६७५ लिटर सड़वा मोहामाद किं. अं. ६७५००/-रू.व १५ लिटर गावठी मोहा दारू किं.अं. १५००/-रु. अशा एकूण ६९,०००/-रु. चा मिळुन आला. त्यानंतर ३) आरोपी नामें नारायण पांडे रा. डोंगरगाव याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर ०६, डब्बे डब्यात एकूण ९० लिटर सडवा मोहामाच किं. अं. ९०००/-रु.व २० लिटर मोहा गावठी दारू कि.अं. २०००/-रू.असा एकूण ११,०००/-रू.वा मुददेमाल मिळून आला. ४) आरोपी नामे संतोष मेहेंगे रा. घुई ता. शेगांव जि. बुलढाणा याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर १० डबे डब्यात एकुण १५० लिटर सहवा मोहा माच किं. अं.१५,०००/-रू.य १० लिटर मोहा गावठी दारू किं. अं. १००० रू.. असा एकूण १६,०००/-रू. वा मुददेमाल मिळून आला. सदरचा मुददेमाल नाशवंत असल्याने घटनास्थळीच नाश करण्यात आला. आज रोजी ग्राम डोंगरगाव शिवारातील मन नदीचे पात्रात गावठी हातभटटी दारूवर केलेल्या ०३ कारवाईमध्ये एकुण ९६,०००/-रु.चा मुददेमाल घटनास्थळावर नाश करून नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे साहेब, सहायक पोलीस अधिक्षक  गोकुल राज जी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले. ए. एस. आय. राजभाउ बचे, पो. हया. विकास वैधकार, पो. शि. निखिल माळी सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त Read More »

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ

Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु  हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद  बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह  शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.  या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ Read More »

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक

Nandura Urban Bank : राज्यातील सहकारी बँकेत पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.  या प्रकरणात पोलिसांनी एका अधिकाऱ्याला अटक देखील केली आहे.  नांदुरा अर्बन बँकेत एका अधिकाऱ्याने बँकेची 5 कोटी 45 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीसांनी तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शर्मा असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. शर्मा याने बँकेतील    इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली. शर्मा याने बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा अर्बन बँक ही बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेली सहकारी बँक आहे. या बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आरोपी गजानन शर्मा याने बँकेत मोठा गंडा घातला. शर्मा यांनी बँकेचे कोट्यवधी रुपये दुसऱ्या बँकेच्या खात्यात वारंवार ट्रान्सफर केले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. बँकेच्या संचालकांना हा प्रकार कळताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी शर्माला अटक केली. आतापर्यंतच्या तपासात 5 कोटी 45 ​​लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. दुसरीकडे ही घटना वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर ठेवीदारांना आपले पैसे गमावण्याची भीती वाटू लागली. बँकेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने ठेवीदारांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक Read More »

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू….

Mumbai News : मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी  होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र, चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. सोमवारी 20 ते 21 वर्षे वयोगटातील पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.  काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही. बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (19) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू…. Read More »

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका

Shrirampur News : श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या 7 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून तब्बल 4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी पोनि, नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, वार्ड क्र 2 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीरामपूर येथे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी आणली आहे. या माहितीवरून नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकास पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आले.   या प्रकरणात तपास करत पोलिसांनी शहारुख हसन कुरेशी विरोधात  श्रीरामपूर शहर पो.स्टे. मध्ये  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे मुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.   दाखल गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक शेख हे करीत आहेत. 

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका Read More »

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू  असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत आहे.    पुन्हा एकदा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  पोलिसांनी या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत चार मुलींना वाचवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील फिनिक्स स्पामध्ये वेश्याव्यवसायाचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी  कारवाई करत चार मुलींची सुटका केली असून स्पाच्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध विभागाला निगडीतील इन्स्पिरिया मॉलमधील फिनिक्स नावाच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले. वेश्याव्यवसायाची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘स्पा’वर छापा टाकला. या प्रकरणात चार मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आले. महिला व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ताचा ते शोध घेत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चारही मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवू शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक Read More »