DNA मराठी

क्राईम

nashik accident

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू

Nashik Accident : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात रस्ते अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अपघातात अनेक जण जखमी होत आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात झाला घटना बसवंत पिंपळगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसवंत पिंपळगाव येथून इनोव्हा. एम एच 15 बी एन झिरो 0555 या क्रमांकाचे चार चाकी वाहन वनी येथील नांदुरी गडावर दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा तोल गेल्याने कार 400 फूट दरीत कोसळून कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक हा गंभीर जखमी असून त्यास स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी वणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी येऊन रेस्क्यू ऑपरेशन करून वाहन चालकाला उपचारासाठी दाखल केले. घटनेचा अधिक तपास घटनेचा अधिक तपास वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदुरी गाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहे.

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू Read More »

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Crime: पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच चांगल्या मारामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांसह एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर परिस्थिती ताणली गेली. रविवारी सकाळी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये तुफान बाचाबाची झाली आणि पुढे हाणामारीला सुरुवात झाली.भांडणात धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर व संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू Read More »

ahilyanagar police

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद

Ahilyanagar Police : बसमधील महिलांचे पर्स चोरी प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रिलस्टार कोमल काळेला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका मुकुंद पालवे (वय – 39 वर्षे, रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) 19 नोव्हेंबर रोजी बसमधून पाथर्डी येथुन प्रवास करीत असताना अनोळखी महिलेने सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपी महिलास अटक केली. या प्रकरणात कोमल नागनाथ काळे (वय 19) असं अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. तपासात चोरी केलेल्या मुद्देमाल तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) याचेकडे दिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन  पथकाने आरोपी सुजित राजेंद्र चौधर याचा शोध घेत त्याला शेवगाव येथून अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे ही रिलस्टार असुन तिचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद Read More »

telangana missing family

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली!

Buldhana News : तेलंगणा राज्यातून जळगात खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांच्या कारसह मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणातील सीतापूरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू, पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाईकांशी शेवटचा संपर्क झाला, मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांत चिंता वाढली. पाटील दाम्पत्य लग्नस्थळी न पोहोचल्याने त्यांच्या महामार्गावरील विविध गावांत चौकशी करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३१ वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले, तर शेवटचे ‘लोकेशन’ नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले. त्यानंतर नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व पोलिसांनी चौकशी सुरु केली. नांदुरा-मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही. परिणामी, विविध चर्चांना ऊत आले होते. अखेर सायनलच्या सुमारास वडनेर उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत चारचाकीसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यांनतर 3 क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ओम साई फाउंडेशनच्या कार्यकत्यांना विहिरीत उतरवून सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी महामार्गालगत ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण आहे व रस्त्याच्या बाजूलाच १० फुटांवर ती विहीर आहे. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हा घातपात आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करीत आहेत.

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली! Read More »

pune crime

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे 16 चाकी टँकर क्र. एमएच-12 वायबी-9186 मधून 39,800 लि. मद्यार्क व एमएच-12 युएम-9887 मधून 39,800 लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी 180 लि. मद्यार्क, 35 लिटर कॅन – 35 लि. मद्यार्क, 20 लिटर प्लास्टिक बादली – 20 लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

ram khade

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांच्यावर नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र आता देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक Read More »

pune crime

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात देखील महिलांवर अत्याचारासारखे घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने पुरुषावर गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्या असल्याची घटना घडली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली. घरात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल Read More »

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला

Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे.या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

Maharashtra Crime: महाराष्ट्र हादरला, तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या

Maharashtra Crime: राज्यात गेला काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. यातच एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येते. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खडबड उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने चिमुकलीची दगडाच्या सहाय्याने हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाला या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे रात्री उशिरा चिमुकलीचे शव पोस्टमार्टम करता मालेगाव मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण डोंगराळे गावावर शोककळा पसरली आहे रात्री उशिरापर्यंत एफआरआय दाखल करायचं काम सुरू होते.

Maharashtra Crime: महाराष्ट्र हादरला, तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या Read More »