Dnamarathi.com

Maruti Wagon R: येत्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या संधीचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार मारुती वॅगन आर अवघ्या 1.15 लाखात घरी आणू शकता.

मारुती वॅगन आरमध्ये तुम्हाला 1061 cc इंजिन मिळते जे 67 bhp पॉवर आणि 34 NM टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे ज्याच्या व्हील्सचा आकार 13 इंच आहे.

याच बरोबर पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, रीयर सीट हेडरेस्ट आणि कप होल्डर देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट देखील कारमध्ये देण्यात आले आहे.

सेफ्टीसाठी  सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, रियर सीट बेल्ट साइड, इम्पॅक्ट टीम ॲडजस्टेबल सीट्स आणि इंजिन इमोबिलायझर या सुविधाही उपलब्ध आहेत. 

cardekho.com वर सेकंड हॅण्ड मारुती वॅगन आर 1.15 लाखात खरेदी करु शकता. आतापर्यंत एकूण ही कार फक्त 26000 किलोमीटर चालली आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली मॅन्युअल ट्रान्समिशन कार आहे.

 जर तुम्ही ही कार बाजारात खरेदी करण्यासाठी गेलात तर तिची ऑन रोड किंमत 3.28 लाख ते 4.06 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *