DNA मराठी

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट अहमदनगर, जिल्हा समाज कल्याण विभाग व ग्रामपंचायत देहरे यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 10 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे दिव्यांगासाठी शिबिर आयोजित करण्यात आले ‍होते. या शिबिरात देहरे व परीसरातील पात्र दिव्यांगाची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तज्ञाकडून तपासणी व नोंदणी करण्यात आली. 

 यातील पात्र दिव्यांग व्यक्तीना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या एडीप 2024 या योजने अंतर्गत नजीकच्या काळात सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे विशेष प्रयत्न करत आहे.

दिव्यांगांच्या तपासणी बरोबरच “अहमदनगर जिल्हा दिव्यांग सर्वक्षण अभियानाचा” शुभारंभ करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांने आपले मोबाईल ॲप डीडीआरसीनगर या नावाने तयार केले असुन या ॲपच्या माध्यमातुन जिल्हयातील दिव्यांगांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. जेणे करुन विविध योजना त्यांच्यापर्यत पोहचविण्यास मदत होणार आहे. 

या शिबिरासाठी पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे व समन्वयक डॉ. दिपक अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराप्रसंगी सरपंच सौ. नंदाताई संतोष भगत, उपसरपंच श्री. दिपक जाधव, देहरे सोसायटीचे  संचालक श्री. भानुदास भगत, देहरे सोसायटीचे  खजिनदार श्री. सुभाष, प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथील डॉ. कसबे सर व डॉ. खरे सर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *