Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.






