Dnamarathi.com

Bhaskar Jadhav : 03 मार्चपासून महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात विरोधकांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

विरोधकांकडून विरोधीपक्ष नेतेसाठी पुरेशी संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती मात्र आता या पदावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात येणार आहे. तर विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेसाठी काँग्रेस दावा करणार आहे.

28 फेब्रुवारी रोजी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गट विधानसभा सदस्यांची बैठक पार पाडली. याबैठकीत विरोधी पक्ष नेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदारांनी ठाकरे यांना दिले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे शिवसेनेतून विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

कोण आहे भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत एंट्री केली. जाधव सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधिमंडळ कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव त्याना आहे. 2009 ते 2014 कालावधीत ते राज्यमंत्री पद भूषविले होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या आक्रमकतेचा फायदा पक्षाला होऊ शकतो.

शिवसेना फुटीनंतर  झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला कोकणात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकणात सर्व जागा ठाकरे शिवसेनाच्या हातून गेल्यानंतर गुहागर मधील जागा भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आपल्यकडे राखण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले आहे.

उद्धव ठाकरे यांची खेळी
कोकण विभागातून एकमेव निवडून आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊन ठाकरे शिवसेना नवीन डाव टाकला आहे. कोकणात शिंदे शिवसेनेला शह देणे,आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत कोकणी मतदार आहे, त्यातल्या त्यात पूर्व मुंबईत कोकणी मतदार  आपल्यकडे वाळविण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी उचललेले पाऊल बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *