DNA मराठी

Buldhana News : करवंड शिवारात दोघावर अस्वलाचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी

bear attacks

Buldhana News : ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात शेतात काम करणाऱ्या 2 जणावर अस्वलाने हल्ला केला आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय 42 वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने अस्वलाने पळ काढला. मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय 52 वर्ष रा. करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला. यात ते देखील जखमी झाले आहे.

दोन्ही जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *