Bank Holidays January 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात देशात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या जानेवारी महिन्यात कधी आणि कुठे देशात बँका बंद राहणार आहे.
1 जानेवारी 2025: बँकेला सुट्टी असेल का?
बुधवार, 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाचे उत्सव साजरे केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अद्याप जानेवारीचे अधिकृत कॅलेंडर जारी केले नसले तरी, या दिवशी देशभरात बँकांना सुट्टी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच नववर्षानिमित्त बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे.
जानेवारी महिन्यात बँकेला किती दिवस सुट्ट्या असतात?
जानेवारी 2025 मध्ये बँकांसाठी एकूण 13 सुट्ट्या असू शकतात. यामध्ये 2 शनिवार आणि 4 रविवार तसेच अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. चला, जानेवारी महिन्यात बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील हे जाणून घेऊया.
जानेवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची संभाव्य यादी
1 जानेवारी 2025 (बुधवार): नवीन वर्षाचा दिवस : संपूर्ण देशात
5 जानेवारी 2025 (रविवार): संपूर्ण देश
6 जानेवारी 2025 (सोमवार): गुरु गोविंद सिंग जयंती – चंदीगड, हरियाणा
11 जानेवारी 2025 (शनिवार): दुसरा शनिवार – संपूर्ण देश आणि मिशनरी दिवस – मिझोराम
12 जानेवारी 2025 (रविवार): स्वामी विवेकानंद जयंती – पश्चिम बंगाल
13 जानेवारी 2025 (सोमवार): लोहरी – पंजाब, जम्मू, हिमाचल प्रदेश
14 जानेवारी 2025 (मंगळवार): मकर संक्रांती आणि पोंगल – विविध राज्ये
15 जानेवारी 2025 (बुधवार): तिरुवल्लुवर दिवस – तामिळनाडू
19 जानेवारी 2025 (रविवार): संपूर्ण देश
23 जानेवारी 2025 (गुरुवार): नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – ओडिशा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल
24 जानेवारी 2025 (शनिवार): चौथा शनिवार – संपूर्ण देश
26 जानेवारी 2025 (रविवार): प्रजासत्ताक दिन – संपूर्ण देश
30 जानेवारी 2025 (गुरुवार): सोनम लोसार – सिक्कीम
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेतून सुट्ट्यांची माहिती अगोदर मिळणे योग्य ठरेल.
हे जाणून घेतल्यास, तुम्ही तुमची बँकिंगशी संबंधित कामे सहजपणे समायोजित करू शकता, जेणेकरून कोणत्याही अडचण येणार नाही.