DNA मराठी

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र

Bangladesh Crisis: बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात  गोंदियामध्ये 72 समजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले. 

 काही दिवसा अगोदर  बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली यात काही लोकांचें दुर्दैवी मृत्यू झाले. याचे पाडसाद संपूर्ण भारतात व हिंदू समुदाय मध्ये उमटू लागले.  अनेक हिंदू संघटना देशातील राज्य पातळीवर आंदोलने केली. तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनेच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले.

 याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदियात सकल हिंदू समाजाच्या वतीने जण आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये गोंदिया जिल्यातील हजारो हिंदू बांधवानी सहभाग घेत सामील झाले. ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण भ्रमण करत बांगलादेशा विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *