DNA मराठी

Bajrang Sonawane : बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाची घटना काळीमा फासणारी आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो आहे. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर आरोप केले आहेत परंतु आरोप करणे सोपे आहे. ते सिद्ध होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा संदीप क्षीरसागर यांची संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे. तुम्ही चौकशी लावा आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत असे देखील म्हटले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून या प्रकरणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून काही दिवसांसाठी गायब झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *