Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात असताना हत्या करण्यात आली असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं देखील इमरान खान यांच्या हत्येच्या बाबतीत मोठा दावा केला आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या केली असल्याचा दावा बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पाकिस्तान सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाच्या बाहेर या बातमीनंतर PTI समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अशी देखील पोस्ट व्हायरल होतीय की, इमरान खान यांची बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना मारहाण झाल्याचा दावा देखील या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे अफगाण टाइम्सने दिलेल्या बातमीच्या आधारे बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने इमरान खान यांची हत्या गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी केली असल्याचा दावा केला आहे. अफगाण टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रावळपिंडीच्या आदियाला जेलमधून बाहेर काढला असल्याचं सांगण्यात आला आहे.






