Nanded News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे.
कावेरी गणेश काळबांडे अस या विद्यार्थिनींचे नाव आहे.ती या आश्रम शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहेत.तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात.सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला जखमा झाल्या. याच जखमेमध्ये चक्क अळ्या झाल्या.डोक्यात जखमा आणि त्यात अळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या या विध्यार्थीनी वर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.