DNA मराठी

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला.

पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले.

तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *