Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.