Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.
या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.