Dnamarathi.com

Ajaz Khan : सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता एजाज खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. माहितीनुसार मुंबईत एजाज खानविरोधात एका माहिलने बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, एका 30 वर्षीय महिलेने एजाज खानविरुद्ध मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या चारकोप पोलिसांनी सांगितले की, अभिनेता एजाज खानविरुद्ध अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल फोन बंद होता. एजाज खान पोलिसांच्या संपर्कातून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

असे सांगितले जात आहे की एजाज खानने अभिनेत्रीला प्रपोज केले होते आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्याने हा बलात्कार केला. एवढेच नाही तर एजाज खानने महिलेला तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते.

बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शो दरम्यान एजाजने स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणीही केली. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सर्व भाग काढून टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *