Dnamarathi.com

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती.

या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *