Dnamarathi.com

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती. 

मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. 

या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी 

 नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *